Driver Sensitization Tab Lab Dainik Gomantak
गोवा

Road Safety: गोव्यातील अपघात कमी करण्‍यासाठी आणखी एक पाऊल! ड्रायव्हर सेन्सिटायझेशन टॅब लॅब; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Driver Sensitization Tab Lab: प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्‍या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात रस्तासुरक्षेला चालना देणे, वाढत्‍या अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या परिणामांबाबत चालकांमध्‍ये जागृती निर्माण करणे या हेतूने ‘डियाजिओ इंडिया’ आणि ‘भारत केअर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गोवा वाहतूक विभागाच्या सहकार्याने ‘ड्रायव्हर सेन्सिटायझेशन टॅब लॅब’ या अभिनव उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्‍या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. हा उपक्रम डियाजिओ इंडियाच्या ‘राँग साईड ऑफ द रोड’ या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

नव्याने सुरू झालेल्या या टॅब लॅबमुळे ‘राँग साईड ऑफ द रोड’ आता गोव्यातील सात प्रादेशिक परिवहन केंद्रांमध्ये कार्यरत झाले आहे. डियाजिओ इंडियाच्या ‘स्पिरिट ऑफ प्रोग्रेस’ इएसजी अ‍ॅक्शन प्लॅनचा हा एक भाग आहे. या लॅबमध्ये चालकांना ४५ मिनिटांचे संवादात्मक व्हिडिओ मॉड्युल पाहावे लागते.

डियाजिओचे दीर्घकालीन उद्दिष्ट

‘डियाजिओ इंडिया’ २०३० पर्यंत १० लाखांहून अधिक लोकांमध्ये ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’संदर्भातील जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. या अनुषंगाने देशभरात ७० पेक्षा जास्त टॅब लॅब्स उभारण्याची योजना आहे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

ही टॅब लॅब केवळ तांत्रिक सुविधा नसून रस्तेसुरक्षेसाठी उचललेले मोठे पाऊल आहे. ‘राँग साईड ऑफ द रोड’अंतर्गत दाखवले जाणारे मॉड्युल्स हे वाहनचालकांच्या चुकीच्या सवयी अधोरेखित करते आणि अशा सवयींचा गंभीर परिणाम किती घातक ठरू शकतो याचे प्रात्‍यक्षिक दाखविते. म्हणूनच ही फिल्म पाहणे लायसन्स प्रक्रियेचा अनिवार्य भाग आहे. यामुळे अपघातांची संख्या निश्‍चितच कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT