Goa Information Department launch website  Dainik Gomantak
गोवा

गोवा माहिती खात्याच्या संकेतस्‍थळाचे अनावरण

कोविड महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर आयोगाने 124 प्रकरणे निकालात काढल्‍याची माहिती यावेळी विश्‍‍वास सतरकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: नूतनीकरण करण्यात आलेल्या राज्य माहिती आयोगाच्या संकेतस्थळाचे अनावरण काल आयोगाच्या कार्यालयात मुख्य माहिती आयुक्त विश्‍वास सतरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासमवेत राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर, सचिव विनेश आर्लेकर, अवर सचिव शशांक ठाकूर उपस्थित होते.

संकेतस्थळाचे अनावरण केल्‍यानंतर श्री. सतरकर म्हणाले, कोविडच्या महामारीत आयोगाचे कामकाज पूर्णतः तहकूब झाले होते. पण, आता सर्व कामे मार्गस्‍थ झाली आहेत. 12 तारखेला लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचे आयोजनदेखील आयोगाने केले होते. सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही त्याचाच भाग होता.

माहिती आयुक्त संजय ढवळीकर म्हणाले, संकेतस्थळावर सर्वसामान्यांना आवश्‍यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी अनेक कार्यालयांतून ती उपलब्ध होत नव्हती. माहिती आयोग हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक माणसाला प्रत्येक खात्याची माहिती मिळावी यासाठीचे नियोजन संकेतस्थळाच्या माध्यमातून केले आहे.

वर्षभरात 124 प्रकरणे निकालात

राज्यात माहिती अधिकाराखालील सुमारे 350 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. कोविड महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर आयोगाने 124 प्रकरणे निकालात काढल्‍याची माहिती यावेळी विश्‍‍वास सतरकर यांनी दिली. कलम 4 च्या अंमलबजावणीसाठी आम्ही आग्रही असल्याचे ते म्हणाले. या कलमानुसार सर्व शासकीय खाती त्यांच्याकडील माहिती सार्वत्रिक करण्यास बांधील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT