Goa Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Goa Industrial Estate: भूजल प्रदूषणाचा धोका! श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीत मळीच्या बेकायदेशीर विल्हेवाटीवर ग्रामस्थांचा संताप; प्रशासनाची तत्काळ कारवाई!

Sristhal Industrial Estate: श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीतील त्या वादग्रस्त टाकीतील मळी जमिनीत खड्डा काढून पुरण्याचा प्रयत्न कंपनीने केल्यानंतर येथील पर्यावरणवाद्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीतील त्या वादग्रस्त टाकीतील मळी जमिनीत खड्डा काढून पुरण्याचा प्रयत्न कंपनीने केल्यानंतर येथील पर्यावरणवाद्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे.

ही मळी सुमारे वीस वर्षे एका महाकाय टाकीत साठवून ठेवली होती. एका महिन्यापूर्वी या टाकीला गळती लागली होती. कोणत्याही क्षणी ही टाकी फुटण्याची शक्यता व्यक्त करून येथील रहिवाशांनी काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर यांना आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती मळी काढून नेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, कंपनीने ही मळी जमिनीत खड्डा खणून गाडण्यास सुरवात केली. यामुळे भूजल प्रदूषित होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर येथील जैवसंपदेवर परिणाम होणार असल्याचे श्रीस्थळ जैवविविधता (Biodiversity) समितीचे अध्यक्ष विनय तुबकी व सदस्य शिरीष पै यांनी सांगितले.

या कंपनीच्या व्यवस्थापकांकडून मळीची तपासणी करण्यासाठी जमिनीत खड्डा खणून ती सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीतील अधिकारी संकेत फळदेसाई यांच्या माहितीप्रमाणे कंपनीला मळीची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, या कृतीची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर यांनी औद्योगिक ‌वसाहतीला भेट देऊन मळी खड्डा खणून सोडण्यात येत असल्याची पाहणी केली व त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले. त्याचप्रमाणे कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर यांनी पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांना मळी खड्डा खणून गाडण्यास जबाबदार असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना केली.

जैवसंपदा व बागायतीचे होणार नुकसान

प्रदूषणकारी मळी जमिनीत गाडल्यास त्याचा विपरित परिणाम येथील जैवसंपदा व या टाकीच्या खालच्या बाजूला असलेल्या आपल्या बागायतींवर होणार असल्याचे सोमदत्त देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी येथील मळी आपल्या बागायतीत जाऊन माड करपले होते. गेले पाच दिवस येथे खड्डा खणून मळी सोडण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी फायर ब्रिगेडचे वाहन सकाळ-संध्याकाळ कार्यरत होते. त्यामुळे शासनाच्या संगनमताने हे काम सुरू होते, असे म्हणण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीप्रमाणे, या महाकाय टाकीत दीड हजार टँकर मळी आहे. यावेळी नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी या मळीची सुरक्षितरीत्या वाहतूक करण्याची मागणी केली. मात्र, पंचायतीला अंधारात ठेवून हे काम सुरू होते, असे पंचायतीच्या सरपंच सेजल गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

SCROLL FOR NEXT