Cuncolim Industrial Estate: CMनी दिले आश्वासन, युरी आलेमावांनी केले स्वागत; म्हणाले सावंत यांनी विधानसभेत जे...

Cuncolim Industrial Estate: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल- सावंत
Cuncolim Industrial Estate
Cuncolim Industrial EstateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cuncolim Industrial Estate: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत वायू आणि जलप्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तसेच विविध औद्योगिक आस्थापनातील बेकायदेशीरता आणि अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला भेट देण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे मी स्वागत करतो, असे कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (इटीपी) उभारण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे स्पष्टीकरण युरी आलेमाव यांना दिले.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये पडून असलेला घातक कचराही येत्या काही दिवसांत हलवण्यात येणार आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण आणि बेकायदेशीरतेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन देण्याची मागणीही केली होती.

Cuncolim Industrial Estate
Goa Budget 2024: शिक्षण, सामाजकल्याण आणि कृषी खात्यासाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा? जाणून घ्या तरतूदी

विधानसभेत वारंवार आवाज उठवून तसेच सरकार दरबारी तक्रारी करूनही सरकार कारवाई करत नाही. जर सरकारने आता कारवाई केली नाही तर कुंकळ्ळीमध्ये कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारने यापूर्वी घातक कचरा स्थलांतरित करण्यासाठी 5 कोटींची तरतूद जाहीर केली होती. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत बांधलेल्या बेकायदा शेडच्या विरोधात नोटीस बजावली होती. मात्र, प्रत्यक्ष कोणतीही कारवाई झाली नाही.

दरम्यान स्थानिकांनी यापूर्वी मेणबत्ती मोर्चा काढला होता आणि मुख्यमंत्र्यांसह इतरांना निवेदनही देवून कुंकळ्ळीतले प्रदूषण त्वरित थांबवण्याची मागणी केली होती.

Cuncolim Industrial Estate
Goa Budget 2024: कसा आहे प्रमोद सावंत सरकारचा अर्थसंकल्प? 10 खाती 10 मुद्दे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cylinder Scheme Goa
Pramod Sawant MGP Political Limits
Goa Surla Farmers Compensation
Goa Shooting Incidents Last 10 Years
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com