Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी

Cuncolim Industrial Estate: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या मासळी प्रक्रिया कारखान्यासाठी मासळी घेऊन येणाऱ्या वाहनातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे कुंकळ्ळीवासीय हैराण झाले आहेत.
Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी
Cuncolim LocalsDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या मासळी प्रक्रिया कारखान्यासाठी मासळी घेऊन येणाऱ्या वाहनातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या कुंकळ्ळीवासीयांना काल (16 ऑक्टोबर) रात्री पुन्हा हाच प्रत्यय आल्याने लोकांनी पोलिसांना पाचारण करून ही वाहने अडविली.

यापूर्वीही लोकांनी कित्येक वेळा ही मासळीची वाहने अडवली होती. काल रात्री एकाच बरोबर सात मासळीची वाहने रस्त्यावरून जात असताना त्यातून असह्य अशी दुर्गंधी वातावरणात पसरल्याने लोक रस्त्यावर आले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोक रस्त्यावर उतरले होते. पहाटे अडीच वाजेपर्यंत लोक रस्त्यावर ठाण मांडून होते. कुंकळ्ळी येथील एक आंदोलक अविराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री ही दुर्गंधी पसरविणारी वाहने रस्त्यावर धावू लागल्याने हैराण झालेल्या लोकांनी व्हॉट्सॲप वरून एकमेकांना संदेश पाठविण्यास सुरुवात केली. त्यांनतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावले.

Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी
Cuncolim News: ..हे 'राष्ट्रीय' दर्जाचे मैदान असेल! कुंकळ्ळी फुटसाल मैदान पायाभरणीवेळी आलेमाव यांचे आश्वासन

तीन वाहनातून दुर्गंधी

पोलिसांनी सुमारे पाच वाहने अडवून तपासणी केली असता त्यातील तीन वाहनातून दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. अखेर लोक रस्त्यावर आल्याचे तसेच पोलिस वाहनांवर कारवाई करत समजताच मासळी घेऊन जाणारी वाहने वसाहतीतून बाहेर पाठविण्याचे उद्योजकांनीच स्वतःहून बंद केले, अशी माहिती अविराज देसाई यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com