Indian Super League  Dainik Gomantak
गोवा

Indian Super League मध्ये आज एफसी गोवा-पंजाब लढत

प्रतिस्पर्धी संघ नवोदित असला तरी आदर- मानोलो मार्केझ

किशोर पेटकर

Indian Super League पंजाब एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा पदार्पण करत आहे, ते नवोदित प्रतिस्पर्धी असले, तरी आम्ही त्यांचा आदर करतो.

आमच्यासाठी ते धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे सामना सोपा नसेल, असे एफसी गोवा संघाचे मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांनी रविवारी सांगितले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी (ता. २) एफसी गोवा आणि पंजाब एफसी यांच्यातील सामना खेळला जाईल.

एफसी गोवाचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना असून पंजाब एफसी संघ दुसरी लढत खेळत आहे. अगोदरच्या लढतीत गतविजेत्या मोहन बागान सुपर जायंट्सकडून पंजाबच्या संघाला ३-१ फरकाने पराभव पत्करावा लागला.

पंजाब एफसीविषयी मार्केझ म्हणाले, ‘‘पराभूत झाले तरी कोलकात्यात ते अतिशय चांगले खेळले. त्यांना सातत्य राखावे लागेल. आय-लीग जिंकून आयएसएल स्पर्धेत आलेला हा संघ तुल्यबळ आहे. प्रशिक्षक, संघातील काही खेळाडू बदललेले नाहीत हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.

निश्चितच ते धोकादायक आहेत, त्यामुळे लढत कठीणच असेल.’’ त्याचवेळी मार्केझ यांनी सोमवारच्या लढतीत विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करणे हीच आपल्या संघाची मानसिकता असल्याचेही नमूद केले.

गतमोसमात एफसी गोवाने जास्त गोल (35) स्वीकारले, याविषयी ते म्हणाले, ‘‘संघासाठी भक्कम बचावही महत्त्वाचा आहे. तुम्ही गोल नोंदविता आणि त्याचवेळी गोल स्वीकारता, ही बाब योग्य नव्हे, त्यासाठी संघात समतोलता राखणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केलीय.’’

अपेक्षांच्या दबावाची सवय झालीय

आयएसएल स्पर्धेत हैदराबाद एफसीने मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद पटकावले, एकंदरीत ते स्पर्धेतील सफल प्रशिक्षक मानले जातात.

आता एफसी गोवाचे मार्गदर्शक या नात्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढली आहे. याविषयी मार्केझ यांनी सांगितले, ‘‘मला अपेक्षांचा दबाव जाणवत नाही, उलट अशी परिस्थिती आवडते. त्याची सवय झाली आहे.’’

तर फुटबॉलही लोकप्रियतेचा शिखरावर

भारतात क्रिकेट लोकप्रियतेच्या बाबतील अव्वल आहे ही बाब मान्य करून इतर खेळही शिखरावर येऊ शकतात असे मार्केझ यांना वाटते. ते म्हणाले, ‘‘भारताने विश्वकरंडक फुटबॉल पात्रतेच्या जवळपास मजल मारली तरीही पुरेसे आहे, तेव्हा हा खेळ देशात उंची गाठेल.

याबाबतीत मी टेनिसपटू राफेल नदालने बजावलेल्या कामगिरीचे उदाहरण देईल. त्याच्या यशामुळे स्पेनमध्ये युवा टेनिसपटूंची संख्या वाढली. भारतात भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सफलतेने या खेळाकडे आकर्षण वाढले आहे.’’

‘‘विजयासाठीच आमचे प्रयत्न असतील, त्यामुळे कदाचित जिंकताही येईल. एफसी गोवा संघ पहिल्या लढतीत खेळला नाही, त्यामुळे त्यांच्या शैलीची विशेष माहिती नाही. एक मात्र खरं, की त्यांचा संघ चांगला समतोल आहे.’’

- स्टायकोस व्हर्गेटिस, पंजाब एफसीचे प्रशिक्षक

‘‘खेळाडू या नात्याने उत्कृष्ट खेळ करणे आणि आयएसएल करंडक जिंकणे हे माझे वैयक्तिक उद्दिष्ट आहे. भारतीय फुटबॉल, एफसी गोवासंदर्भात सकारात्मक माहिती मिळाली, त्यामुळे प्रथमच ऑस्ट्रेलियातील फुटबॉल सोडून मी भारतात खेळण्यास आलो.’’

- पावलो रेट्रे, एफसी गोवाचा ऑस्ट्रेलियन मध्यरक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

SCROLL FOR NEXT