Morjim Road Issue: मोरजीतल्या रस्त्यांचा प्रश्न काही सुटेना! स्थानिकांचे आमदारांना साकडे

कंत्राटदारांनाही सततच्या पावसामुळे काम करताना व्यत्यय निर्माण होतोय
Morjim Road Issue
Morjim Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Road Issue मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्ते खड्डेमय बनले असून त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष शेटगावकर यांनी आमदार जीत आरोलकर यांच्याकडे केली आहे.

आमदार आरोलकर हे मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या गणेश विसर्जनावेळी आले होते. त्यावेळी मंदिर परिसरात त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

मोरजी किनारपट्टी भागातील रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली असून सतत पडणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसह कंत्राटदारांनाही सततच्या पावसामुळे काम करताना व्यत्यय निर्माण होतोय.

दरवर्षी रस्त्यांना खड्यांचे ग्रहण लागले असून रस्त्यानजीक गटारे नसल्याने पाणी साचण्यास सुरुवात होते मर्डीवाडा, खिंड परिसरातील वार्निवाडा, तसेच निमवाडा येथे वीज वाहिनीच्या भूमिगत कामांसाठी केलेल्या खोदाईमुळे खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सरकारने याकामी लवकरात लवकर लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांनी केलीय.

Morjim Road Issue
Goa September GST Collection: गोव्याला सप्टेंबरमध्ये GST मधून मिळाला 497 कोटी रूपये महसूल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com