Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: हैदराबाद संकटात, एफसी गोवाचे पारडे जड

Indian Super League: अपराजित मालिका कायम राखण्याची संधी

किशोर पेटकर

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल मोसम अर्ध्यावर असताना प्रमुख खेळाडूंनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे हैदराबाद एफसी सध्या संकटात असून कमजोर कामगिरीमुळे स्पर्धेतील माजी विजेता संघ शेवटच्या शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना अपराजित एफसी गोवा संघाचे पारडे जड असेल.

हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर गुरुवारी (ता. 1) एफसी गोवा व हैदराबाद एफसी यांच्यातील सामना खेळला जाईल.

एफसी गोवा संघाने 10 सामन्यांत सात विजय व तीन बरोबरी या कामगिरीसह 24 गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला आहे. दुसरीकडे 11 सामन्यात हैदराबादने सात पराभव पत्करले असून चार बरोबरीमुळे त्यांच्या खाती फक्त चार गुण आहेत.

एफसी गोवाचे प्रमुख प्रशिक्षक मानोलो मार्केझ गतमोसमापर्यंत हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक होते. स्पर्धेचा दुसरा टप्पा जास्त आव्हानात्मक असल्याचे ते मानत आहेत, तरीही अपराजित मालिका कायम राखण्यास ते इच्छुक आहेत.

कोणतीही फुटबॉल लीग असो, स्पर्धेचा दुसरा टप्पा नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण असतो, असे मत एफसी गोवा मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केले. आपल्या पूर्वीच्या संघातील परिस्थिती खूपच बदलली आहे.

त्यांना समस्यांनी ग्रासले असले, तरी त्यांच्या संघात गुणवान नवोदित खेळाडू असल्यामुळे सामना सोपा असल्याचे आपण मानत नाही, प्रतिस्पर्धी तुल्यबळ असल्याचे मार्केझ यांनी गुरुवारच्या सामन्याविषयी सांगितले.

स्पॅनिश खेळाडू व्हिक्टर गोन्झालेझ दुखापतीमुळे एफसी गोवा संघातून बाहेर गेला आहे. अनुभवी बचावपटू संदेश झिंगन दुखापतग्रस्त आहे.

या दोन्ही जम बसलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका एफसी गोवास बसू शकतो. त्यांनी बोर्हा हेर्रेरा व निम दोरजी तमांग यांना बाकी मोसमासाठी करारबद्ध केले आहे, पण ते गुरुवारचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. हैदराबादकडून खेळलेला महंमद यासिरही एफसी गोवा संघात आाला आहे.

आकडेवारीत सामना

- एफसी गोवा स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ, ७ विजय व ३ बरोबरी

- मागील ५ लढतीत एफसी गोवाचे ३ विजय, २ बरोबरी

- हैदराबादच्या मागील ५ लढतीत ४ पराभव, १ बरोबरी

- एफसी गोवाच्या स्पर्धेत ६ क्लीन शिट्स, फक्त ५ गोल स्वीकारले

- हैदराबाद एफसीवर प्रतिस्पर्धी संघांचे १९ गोल

- हैदराबाद एफसी विजयाविना, ७ पराभव व ४ बरोबरी

- एकमेकांविरुद्ध ८ सामने, प्रत्येकी ३ विजय, २ बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT