Goa Crime: ब्रेकअपनंतर अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल, गोव्यातून एकाला अटक

व्हिडिओ कॉलद्वारे चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर बनावट प्रोफाईल तयार करुन इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसिद्ध केला.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याप्रकरणी गोव्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

विनय मारुती शेकापुरे (वय 23, रा. पणजी, गोवा, मूळ नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस तपासानुसार, संशयित शेकापुरे याने ब्रेकअपनंतर पीडितेला व्हिडिओ कॉल करुन अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओ कॉलद्वारे चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर बनावट प्रोफाईल तयार करुन इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसिद्ध केला.

पीडितेने या घटनेनंतर पुण्यातील सहकार नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा पणजीतील ठिकाणाचा शोध घेतला.

परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मालाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान नावडकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाच्या मदतीने संशयिताला अटक करण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

woman blackmailed with obscene photos
Crime News
Soham Naik Bail Application
gautam khattar case latest update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com