Indian Coast Guard Dainik Gomantak
गोवा

अखेर 60 तासानंतर ‘सिंधू साधना’ बंदरात

भरकटलेल्या जहाजातील 36 जण सुखरूप, भारतीय तटरक्षक दलाला यश

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Coast Guard इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कारवार किनारपट्टीच्या दिशेने भरकटलेल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेच्या (एनआयओ) ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाजावरील ३६ जणांना सुमारे ६० तासांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय तटरक्षक दलाने सुखरूपपणे काल मध्यरात्री मुरगाव बंदरात आणले.

एनआयओचे ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाज समुद्रात नादुरुस्त झाल्याने ते ताशी तीन सागरी मैल वेगाने कारवारच्या किनारपट्टीकडे वाहत चालले असल्याचा संदेश भारतीय तटरक्षक दलाला बुधवारी दुपारी एकच्या दरम्यान मिळाला.

सिंधू साधना हे एनआयओचे एक अत्याधुनिक संशोधन जहाज आहे. या जहाजावरून मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे व संशोधन डेटा नेण्यात येत होता. परंतु ते समुद्रात नादुरुस्त झाले आणि संकटात सापडले. या जहाजावर आठ शास्त्रज्ञांसह ३६ जण होते.

या मोहिमेमध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजीत’ व ‘वराह’ या दोन जहाजांनी मोठी कामगिरी बजाविली. नादुरुस्त झालेल्या ‘सिंधू साधना’ जहाजाला घेऊन ‘सुजीत’ जहाज २८ रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनलवर पोचले.

भारतीय तटरक्षक दलाने जलद व कार्यक्षम प्रतिसाद देऊन ३६ जणांचे जीव वाचविले. सदर मोहीम खडतर होती. पण तशाही परिस्थितीत सिंधू साधनापर्यंत पोचविण्याची कामगिरी भारतीय तटरक्षक दलाने केली.

अथक परिश्रम : सुमारे 60 तासांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय तटरक्षक दलाने सुखरूपपणे काल मध्यरात्री मुरगाव बंदरात आणले. त्यानंतर ते गोव्याच्या दिशेने निघाले. यावेळी अनेक अडथळे निर्माण झाले.

दोरखंड तुटण्याचे प्रकार घडले. जहाजावरील सर्व शास्त्रज्ञ व इतर कर्मचारी सुरक्षित आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या जलद प्रतिसाद आणि धोरणात्मक समन्वयाने मानवी जीवन आणि पर्यावरण या दोहोंचे संरक्षण करण्यासाठी त्यांची अतूट बांधीलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT