Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Rahul Gandhi: राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई 'न्याय यात्रा'; लोकांच्या अधिकारांसाठी मोहीम

Rahul Gandhi: यात्रेच्या माध्यामातून देशभरातील अन्यायाविरुद्ध लढा

गोमन्तक डिजिटल टीम

Rahul Gandhi: भाजप सरकाराच्या काळात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायापासून देशातील लोक वंचित झाल्याचा आरोप करत हे सर्व न्याय मिळवण्यासाठी राहुल गांधी मणिपूर ते मुंबई पर्यंत न्याय यात्रा सुरु करणार आहे अशी माहिती एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा यांनी दिलीय.

भारत जोडो न्याय यात्रा पुस्तिकेच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर उपस्थितीत होते..

लोकांवर अन्याय- हर्षद शर्मा

"भाजप सरकारने आमच्या लोकांवर अन्याय केला आहे. आपल्या लोकशाहीला आणि आपल्या संविधानाला खूप दुख पोहचविले आहे. बेरोजगारीने तरुण त्रस्त आहेत. महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्रास होत आहेत.

सरकार गरिबांना गरीब करत आहे आणि मूठभर अब्जाधीशांना आणखीन श्रीमंत करत आहे. हे सर्व लोकांना माहित आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक आणि गरीब यांच्याशी पद्धतशीरपणे भेदभाव करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. महिलांची फसवणूक झाली आहे. सर्व स्वायत्त संस्थांची गळचेपी करण्यात आली असून बेकायदेशीरपणे निवडून आलेली सरकारे उलथून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटीचा विरोधी पक्षांविरुद्ध वापर करणे हे आता रूढ झाले आहे," असे शर्मा म्हणाले.

10 वर्षांत लोकांवर अन्याय- अमित पाटकर

अमित पाटकर यांनी यावेळी बोलताना म्हटले की भारत जोडो न्याय यात्रेतून कित्येक विशय जिथे लोकांवर अन्याय झाला आहे ते लोकांपर्यंत नेणार आहेत. " मागील 10 वर्षांत लोकांवर अन्याय झाले आहे.

तरुणांना रोजगार मिळत नाही, महिलाना सुरक्षा मिळत नाही आणि शेतकारांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. इंधनाची किंमत वाढलेल्या आहेत. एलपीजी लोकांना पऱवडत नाही अशी परिस्थिती आहे," असे पाटकर म्हणाले.

तीन शेती कायदा रद्द करण्याची मागणी करतान 750 शेतकऱ्यांना मरण आले. तसेच सरकाराच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्त्या करत असल्याचे ते म्हणाले.

खासदार फ्रांसिस सार्दिन म्हणाले की एनसीआरबीच्या अहवाला प्रमाणे महिलां विरूध्द गुन्हे वाढले आहेत. तासाला 51 एफआयआर होत असून भाजपने महिलांवर अन्याय करणाऱ्यांना अभय दिले आहे.

जीएसटीची अमलबजावणी अचूकपणे झाली नसल्याचा आरोप सार्दिन यांनी केला. आवश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करुन लोकांना त्रास दिल्याचे ते म्हणाले.

अमरनाथ पणजीकर म्हणाले, 'ह्या यात्रेत कित्येक लोक सहभागी होणार असून न्यायासाठी सर्व एकत्र येणार आहेत. 14 जानेवारी पासून सरु होणाऱ्या या यात्रेत कॉंग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT