CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Independence Day 2023: ...अन् अचानक सोशल मीडियावर झळकला तिरंगा

पंतप्रधानांचे आवाहन : मुख्यमंत्र्यांसह मंत्री, राजकीय नेत्यांनी बदलले मोबाईलचे डीपी व स्टेटस

गोमन्तक डिजिटल टीम

Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलून भारताचा तिरंगा ठेवावा.

त्यामुळे देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

त्याला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या अकाऊंटचे डीपी आणि ‘स्टेटस’वर तिरंगा झळकवला.

नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी केंद्र सरकारने यंदाही ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली आहे. रविवारपासून १५ ऑगस्टपर्यंत आपल्या घरासमोर राष्ट्रध्वज उभा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

घरोघरी फडकवा राष्ट्रध्वज !

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. हर घर तिरंगा अभियान हा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे.

गेल्या वर्षी २२ जुलै २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदींनी लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते.

आवाहनाला तत्काळ प्रतिसाद

या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री रोहन खंवटे, विश्‍वजीत राणे, आमदार दिव्या राणे, खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी आपले सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी आणि स्टेटसवर तिरंगा झळकवला. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही त्याचे अनुकरण केले.

स्वातंत्र्यसैनिक, सैन्य दलातील अधिकारी आणि जवानांनी केलेल्या त्यागाचे स्मरण व्हावे, यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत नागरिकांनी आजपासून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि त्याचा सेल्फी ‘हर घर तिरंगा डॉट कॉम’वर अपलोड करावा.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT