Independence Day Celebration Dainik Gomantak
गोवा

Independence Day Celebration: ‘हर घर जल’च्या गोव्यातील लाभार्थ्यांना दिल्लीचे निमंत्रण

स्वातंत्र्यदिन सोहळा: देशभरातील अनेक नागरिक लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात होणार सहभागी

गोमन्तक डिजिटल टीम

Independence Day Celebration नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी तसेच पंतप्रधानांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे.

या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजीसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार तसेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांचे लाभार्थी आणि यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

कुडचडे येथील ‘हर घर जल योजनेचे’ लाभार्थी योगेश पार्सेकर, दर्शना पार्सेकर आणि सावर्डे येथील माया आर्सेकर, समीर आर्सेकर यांना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे.

सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील नागरिकांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दूरून पाणी आणण्याचे आमचे श्रम वाचले’

‘हर घर जल’ मोहिमेच्या माध्यमातून नळजोडणी मिळाल्यामुळे दिवसाचे किमान दोन तास वाचल्याचे माया आर्सेकर आणि समीर आर्सेकर सांगतात. केवळ वेळच नाही, तर दूरून पाणी आणण्याचे श्रमही वाचले आहेत, अशी प्रतिक्रिया आर्सेकर दांपत्याने दिली.

पाण्याच्या मोठ्या संकटातून आणि त्रासातून सुटका केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कुडचडे येथील योगेश पार्सेकर यांनी सांगितले की, त्यांच्या आईवडिलांना भल्या पहाटे उठून पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आता घरात पाणी मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाचे श्रम वाचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT