Goa: पर्ये ः (Porem) वाळवंटी नदीच्या पूर नियंत्रण क्षेत्रात वाढती बांधकामे (Construction) वाळवंटीच्या पुराला कारणीभूत ठरत आहेत. (Desert river flood control area) यावेळी वाळवंटीला पूर आल्यावर याची कारणे पाहताना नदी किनारी भागात वाढलेली बांधकामेही एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. इतर अनेक कारणांपैकी हे एक कारण पुढे येत आहे. वाळवंटी नदीला स्वतः चे असे पूर नियंत्रण क्षेत्र आहे. स्थानिक भाषेत त्याला ‘जुवाड’ असे संबोधले जाते. पूर्वी काळी अशी जुवाडे खाली होती, त्यावर कोणत्याही प्रकारची लागवड नसायची. तसेच त्या ठिकाणी नदीचे पूर नियंत्रण करणारी 'शेरणी' सारखी वनस्पती (Plants) किंवा विशिष्टप्रकारचे गवत उगवायचे. पण नदी किनारी आता या वनस्पतीचे अस्तिव नष्ट होत चालले आहे. (The existence of the plant is being destroyed) त्यामुळे याचा परिणाम पुरावर होतो.
पर्ये सत्तरीतील वाळवंटी नदी किनारी बांधकामांना मोठा उत आला आहे. साखळी ते पर्ये पर्यत मुख्य रस्ता वाळवंटी किनाऱ्याला लागून आहे. त्यामुळे या रस्त्याबाजूला बांधकामे उभारली जात आहे. त्यासाठी पूर्वी मातीचा भराव टाकून बुजवली जात आहे. त्यावर नंतर बांधकामे उभारली जात आहेत. तसेच या नदी किनारी फार्म हाऊस उभारण्यासाठी बांधकामे होत आहे. यासाठी स्थानिक पंचायत मंडळ आणि संबंधित सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ही कामे सुरू आहे. अशा या प्रकारामुळे नदीची नैसर्गिक पूरनियंत्रण क्षेत्र नष्ट होत चालल्याने पुराचा धोका वाढला आहे. घोटेली ते साखळी पर्यत अशी बांधकामे वाढलेले आहे.
पूर्वी नदी काठी व पात्रात 'शेरणी', भेडशी अशा वनस्पती होत्या. तसेच एक विशिष्ट प्रकारचे गवत ही होते. या वनस्पती नदीचे पूर नियंत्रण करण्यास मदत करायची. शेरणी मुळे नदीला आलेल्या मोठ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रणात ठेवायचा. तसेच या वनस्पती पुराच्या वेळी नदी पात्राची झीज होऊ द्यायचे नाही. पण जल संपदा खात्याने नदीतील गाळ काढताना अशा वनस्पती पूर्णपणे उखडून टाकल्याने नदी पात्र सपाट झाले आणि त्यामुळे पुराचा धोका वाढला. त्यामुळे नदीकाठच्या नैसर्गिक वनस्पतीची झालेली कत्तल ही एक पुराचे कारण समोर येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.