Goa: RSSचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीला

डिचोली, सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्याना ह्या पुराचा जबरदस्त फटका बसला,या तालुक्यातील कित्येक गाव पाण्याखाली गेल्याने त्यांचा उर्वरीत भागाशी संपर्क तुटला होता.
RSS Workers
RSS WorkersDainik Gomantak

मडगाव: 'अविरत श्रमणे संघजिणे' या आपल्या ब्रिदाला जागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 175 स्वयंसेवकांनी गोव्यातील पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना मदतीचा हात दिला. गोव्यात मागील कित्येक दिवस पावसाची संततधार चालुच होती आणि म्हणता म्हणता ह्या पाऊसाने रौद्र रुप धारण केले,राज्यातील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या, वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि डिचोली, सत्तरी, धारबांदोडा तालुक्यात पुराची आपत्ती ओढवली होती. डिचोली,सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्याना ह्या पुराचा जबरदस्त फटका बसला,या तालुक्यातील कित्येक गाव पाण्याखाली गेल्याने त्यांचा उर्वरीत भागाशी संपर्क तुटला होता. (RSS workers are helping the flood victims in Goa)

पाऊस थैमान घालत होता, कित्येकांच्या घरात पुराचे पाणी घुसले, कित्येक संसार उध्वस्त झाले,सगळी कडे हाहाकार माजला. अशी भयावह पुरपरीस्थिती असूनसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 175 स्वंयसेवक मदतीसाठी या भागांमध्ये पोहचले, पुरग्रस्त भागांतल्या उसगाव गांजे,साकोर्डा, धाकोण, शिगाव, तीळार, सुर्ला, पाळी, भामई, वाळपई मध्ये गरजेचे सामान पोहचवुन पुरग्रस्ताना मदतीचा हात दिला.

RSS Workers
Goa: डिचोली शांतादुर्गा विद्यालयासाठी 3 कोटींचा इमारातीचा प्रकल्प

पिण्याचे पाणी,तांदुळ, डाळ,आटा,दुध पाउडर असली जीवनावश्यक सामग्री गराजुना पोहचती केली,कित्येक उपाशी लोकाना जेवण पोहचवले,कित्येक घरातील लोकाना कपडे,सतरंजी,चादर व इतर सामान दिले, गरज असलेल्या गावाना टैंकरने पाण्याचा पुरवठा केला,पुराचा तडखा बसलेल्या मंदिरांतील आणि घरांतील साचलेला गाळ उपसुन फ्लोर क्लीनर व फिनाइल घालुन स्वच्छ करून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com