Bicholim Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa: रोजंदारीवरील स्वच्छता कामगारांच्या वेतनात वाढ; डिचोली पालिकेचा निर्णय

डिचोली पालिकेच्या (Bicholim Municipality) रोजंदारीवरील स्वच्छता कामगारांच्या पगारात आता वाढ होणार आहे. पालिका मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली पालिकेच्या (Dicholim Municipality) रोजंदारीवरील स्वच्छता कामगारांच्या पगारात आता वाढ होणार आहे. पालिका मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. या कामगारांचा विमाही उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती नगरसेवक सुदन गोवेकर यांनी दिली. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची बैठक पालिका सभागृहात पार पडली. या बैठकीस पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर (Kabir Shirgaonkar) नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी, उपनगराध्यक्ष तनुजा गावकर, नगरसेवक सतिश गावकर, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर,रियाज बेग, निलेश टोपले, दीपा शेणवी शिरगावकर, दीपा पळ आणि पांडुरंग कोरगावकर हे सर्व नगरसेवक उपस्थित होते. स्वच्छता कामगारांच्या पगारात वाढ करतानाच पालिकेचा महसूल वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली.

मलनिःसारण प्रकल्प

मलनिःसारण प्रकल्पाचा (सिव्हरेज प्रकल्प) विषयही बैठकीत चर्चेला आला. शहरातील सांडपाण्याचा बंदोबस्त होण्यासाठी मलनिःसारण प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमे मार्गी लागणे गरजेचे आहे. असे मत बैठकीत पुढे आले. प्रकल्पासाठी जागेची निवड करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी स्थानिक आमदारांनी सहकार्य करावे. अशी मागणीही करण्यात आली. सॅनिटायझेशन आणि अन्य विकासात्मक कामांबाबतीतही या बैठकीत चर्चा झाली. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या बैठकीत पुढे केल्या. विकासकामांसाठी आपले सहकार्य नक्कीच मिळणार. असे आश्वासन सभापती पाटणेकर यांनी दिले. नगराध्यक्ष श्री. फळारी यांनी स्वागत केले. या बैठकीस पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT