Kala Academy  Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: कला अकादमीतील ‘त्‍या’ लाईट्‌स डान्स बार, डिस्कोत वापरण्‍याच्‍या दर्जाच्‍या; कृती दल समितीच्या सदस्याने स्पष्टच सांगितले

Kala Academy Controversy: कला अकादमीतील नाट्यगृहात सध्या प्रकाशयोजनेसाठी ज्‍या लाईट्स लावण्यात आल्या आहेत, त्या डान्स बार, डिस्को, नाईट क्लबमध्ये वापरण्‍याच्‍या दर्जाच्‍या आहेत. त्या लाईट्‌स नाट्यगृहासाठी योग्य नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

Inappropriate Disco Lights In Kala Academy Theatre Says Francis Cuelho

पणजी: कला अकादमीतील नाट्यगृहात सध्या प्रकाशयोजनेसाठी ज्‍या लाईट्स लावण्यात आल्या आहेत, त्या डान्स बार, डिस्को, नाईट क्लबमध्ये वापरण्‍याच्‍या दर्जाच्‍या आहेत. त्या लाईट्‌स नाट्यगृहासाठी योग्य नाहीत, असे कला अकादमी बांधकाम आणि साधनसुविधा कृती दल समितीचे सदस्य फ्रान्‍सिस कुएल्‍हो यांनी सांगितले. गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात कुएल्‍हो बोलत होते. नाट्यदिग्दर्शक ज्ञानेश मोघे हे देखील त्‍यात सहभागी झाले होते. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

फ्रान्‍सिस कुएल्‍हो म्हणाले, कला अकादमीच्‍या (Kala Academy) नूतनीकरण कामात झालेली अनागोंदी तसेच इतर बाबींसाठी कृती समिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे वेळ मागत आहे, परंतु तो दिला जात नाही आहे. एकंदरीत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर समितीचा राजीनामा देऊन आम्ही ज्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत त्या जनतेसमोर मांडू. कारण त्‍याशिवाय आमच्याकडे पर्यायच नसेल.

कला अकादमीत जे तंत्रज्ञ आहेत, ते चांगले आहेत. परंतु यंत्रणेची जी दुरवस्था झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. सर्व काम कंत्राटदारावर सोपविण्यात आले. कुणा जाणकारांच्या सल्ल्याने काम केले हे त्यांनाच माहीत. परंतु आता कला अकादमीच्या तंत्रज्ञांवर दोष ठेवत त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे आता कलाकारांना एकत्र येत कला अकादमीच्या व्यवस्थापनाबाबत काय तो सोक्षमोक्ष लावावाच लागेल, असे कुएल्‍हो यांनी सांगितले.

कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत अनेकदा आम्ही आवाज उठविला. परंतु सर्व काही आपल्यालाच कळते या आविर्भावात जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे. जी कला अकादमी तिची ध्वनियंत्रणा आणि व्यवस्थापनासाठी ओळखली जायची, त्‍याच कला अकादमीची सध्‍याची प्रकाशयोजना, ध्वनी, वातानुकूलीत सेवा बिकट आहे. तेथे बजबजपुरी माजली आहे. काहींनी या नूतनीकरणात कोणत्या प्रकारच्या त्रुटी आहेत, कोणते उपाय केले पाहिजेत हे दाखवणारा सविस्तर अहवाल दिलाय. परंतु तो देखील मानायला तयार नाहीत अशी स्‍थिती असल्याचे ज्ञानेश मोघे यांनी सांगितले.

प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनी ज्या बाबी सांगितल्या, त्या रास्तच आहेत. त्यांनी तर कला अकादमीची ध्वनियंत्रणा देखील वापरली नाही. अन्यथा त्‍या नाट्यप्रयोगाचे काय झाले असते सांगणे कठीण. नाट्यगृहात जी ध्वनियंत्रणा वापरण्यात आली आहे, तीसुद्धा योग्य नाही. कृती दलाने ज्यावेळी या कामांबाबत माहिती घेतली त्यावेळी असे दिसून आले की या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केलेली नाही. सारे काही कंत्राटदारावर सोपविण्यात आले होते, असेही मोघे म्‍हणाले.

गैरव्यवस्थापनाचा उत्‍कृष्‍ट नमुना

कला अकादमीची वास्तू जागतिक स्तरावरील वास्तुविशारदाची कलाकृती आहे. या वास्तूने आम्हाला घडविले. माजी मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे कलाकारांशी बोलायचे, समस्‍या जाणून घ्‍यायचे. परंतु आताच्‍या राजकारण्यांनी तो संवादच सोडून दिला आहे. आज कोणता राजकारणी नाटक किंवा कार्यक्रम पूर्ण पाहतो? कला अकादमी आज गैरव्यवस्थापनाचा उत्‍कृष्‍ट नमुना ठरत असल्याचे मत मोघे यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT