कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या साधनसुविधांचा आढावा घेण्यासाठी तसेच त्यात सुधारणा व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी प्रसिद्ध नाट्यकर्मी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांचे कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
सरकारने स्थापन केलेल्या या कृती दल सदस्यांमध्ये माजी सभापती तोमाझिन कार्दोज, विलियम फर्नांडिस, प्रवीण गावकर, सतीश गावस, ‘गोवा कला राखण मांड’चे देविदास आमोणकर आणि फ्रान्सिस कुएल्हो, चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनचे प्रतिनिधी, सरकारचे मुख्य वास्तुविशारद, कला व संस्कृती खात्याचे संचालक, कला अकादमीचे सदस्य सचिव, ‘ईएसजी’चे सरव्यवस्थापक मृणाल वाळके, ‘साबांखा’चे मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांचा समावेश आहे.
कला अकादमीच्या वास्तूचे करण्यात आलेले नूतनीकरण वादात सापडले आहे. या वास्तूतील खुल्या सभागृहाचे छत कोसळल्यानंतर या विषयाकडे अनेकांचे लक्ष गेले आहे. दीनानाथ मंगेशकर सभागृहाला लागलेली गळती, छताचे पडलेले तुकडे, सदोष ध्वनी यंत्रणा आदी मुद्दे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कलाकारांनी कला अकादमी वास्तूच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवणे सुरू केले आहे. त्यांनी कला अकादमीच्या समोर आंदोलनही केले आहे. ‘गोवा कला राखण मांड’ या नावाने ते सारे एकवटले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दोन दिवसांपूर्वी त्यांनी भेट घेतली होती.
मंत्री गावडे यांच्याविरोधात मध्यंतरी कलाकारांनी आवाज उठवणे सुरू केले होते. त्यासाठी पणजीतही सभा घेण्यात आली. गावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली होती. चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशननेही काही हरकतीचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनाही या समितीवर स्थान देण्यात आल्याने त्यातून कोणते सत्य बाहेर येते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.