Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction In Goa: मांद्रे किनारी भागात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट

Illegal Construction In Goa: ‘सीआरझेड’चे उल्लंघन : लेखी तक्रार दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Construction In Goa: एका बाजूने मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तर दुसऱ्या बाजूने बिगर गोमंतकीय नागरिक ‘सीआरझेड’चे उल्लंघन करून रस्त्याच्या बाजूला आणि देवस्थान स्थळाला टेकूनच बेकायदेशीर बांधकामे करत असल्याची तक्रार स्थानिक युवक संदेश सावंत यांनी संबंधित खात्याला दिलेली आहे.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील नारोबा देवस्थान परिसरात आणि समुद्राच्या भरती रेषेपासून काही अंतरावरच सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे बांधकाम केले जात आहे.

त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार लेखी स्वरूपात संदेश सावंत यांनी दिली. जर सरकारने या बांधकामावर कायदेशीर कारवाई केली नाही, तर आपण पंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसून आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी तक्रारदार संदेश सावंत यांनी दिला.

संदेश सावंत यांनी सांगितले की या बेकायदेशीर बांधकामांमध्ये माजी सरपंचाचा हात आहे.

मागच्या वेळी नारोबा देवस्थानच्या जवळ असेच बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यावेळी याच माजी सरपंचांनी ते बांधकाम बंद पाडले होते. त्यामुळे आता परत हे बांधकाम कसे काय सुरू केले, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

रस्त्याच्या बाजूला टेकून हे बांधकाम होत असल्याने पहिला मजला तयार झाल्यानंतर त्याचे पाणी थेट रस्त्यावर येईल.

दर पंधरा दिवसांनी पंचायतीच्या तलाठ्यांनी सीआरझेड विभागामध्ये जर बेकायदेशीर बांधकाम होत असेल तर त्याचा सर्व्हे करून तसा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवणे गरजेचे आहे.

- संदेश सावंत, स्थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT