IIT Goa Dainik Gomantak
गोवा

IIT Goa: आयआयटीला मोठी सुपीक जमीन नकोच!

'सडेतोड नायक' मध्‍ये संकुलाचा पुनर्विचार करण्‍याची मागणी..

दैनिक गोमन्तक

Sanguem: येथील 10 लाख चौरस मीटर सुपीक जमीन आयआयटीला कायमस्‍वरूपी कॅम्‍पस्‌ उभारण्‍यासाठी देणे चुकीचे आहे. त्‍याऐवजी फर्मागुडी इंजिनिअरिंग कॉलेजचा परिसर किंवा गोवा विद्यापीठाच्‍या जागेत उंच इमारती उभारून तेथे हा प्रकल्‍प सामावून घेणे राज्‍याच्‍या हिताचे होईल, असे परखड मत भाजपच्‍या सुकाणू समितीचे सदस्‍य इंजिनिअर दत्ता खोलकर यांनी काल गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ चर्चेत भाग घेताना व्‍यक्त केले. खोलकर यांच्‍या बरोबरीने गोव्‍यातील केमिकल अभियंता अरुण बाबा नायक यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

संपादक राजू नायक यांनी संचालित केलेल्‍या या कार्यक्रमात बोलताना खोलकर पुढे म्‍हणाले, गोव्‍यात 2014 साली मनोहर पर्रीकर यांनी आयआयटी आणली. गेली आठ वर्षे ती फर्मागुडी येथील गोवा इंजिनिअरिंग कॉलेजच्‍या प्रांगणात सुरू आहे. दोन बॅच त्‍या केंद्रातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्‍या आहेत. पर्रीकर स्‍वत: आयआयटी असल्‍याने त्‍यांना या केंद्राबाबत आकर्षण होते व 2012 च्‍या पक्षाच्‍या जाहीरनाम्‍यात त्‍यांनी आयआयटीचे कलम टाकले होते. आज या केंद्रात 100 विद्यार्थी प्रवेश घेतात.

आयआयटीच्‍या बरोबरीने गोवा फर्मागुडी कॅ्म्‍पस्‌ (Goa Fermagudi Campus) मध्‍ये एनआयटीसुद्धा सुरू आहे व त्‍यासाठी कुंकळ्‍ळी येथे कायमस्‍वरूपी कॅम्‍पस्‌ उभारण्‍यास सुरूवातही झाली आहे. परंतु एनआयटीचे वैशिष्‍ट्य म्हणजे तेथील 50 टक्के जागा गोवेकरांसाठी आरक्षित असल्‍याने त्‍या संधीचा गोव्‍याला फायदा आहे. राज्‍यातील तांत्रिक शिक्षणाचा दर्जाही या संस्‍थेमुळे वाढण्‍यास मदत झाली. या पार्श्वभूमीवर आपल्‍या चिमुकल्‍या राज्‍याने भली मोठी जमीन आयआयटीसाठी गमावणे योग्‍य होणार नाही, असे मत दत्ता खोलकर यांनी मांडले.

मुख्‍यमंत्र्यांनी केंद्राकडे प्रश्‍‍न उपस्‍थित करून पायाभूत सुविधा उभाराव्‍यात: देशात आयआयटीची 23 केंद्रे असून गोव्‍याचा क्रमांक त्‍यात सर्वांत शेवटी लागतो. दर्जाच्‍या दृष्‍टीनेही या केंद्राला खूप काम करावे लागेल. परंतु त्‍याआधी गोव्‍याची जी 20-22 मुले प्रवेश परीक्षेत नामांकन मिळवितात, ती गोवा केंद्रात प्रवेश घेण्‍याऐवजी आघाडीच्‍या आयआयटी संकुलात प्रवेश घेणे श्रेष्‍ठ मानतात. त्‍यामुळे गोवा केंद्राचा फायदा तसा कमीच आहे.

परंतु, गोवा केंद्राच्‍या कायमस्‍वरूपी संकुलाबाबत स्‍पष्‍ट भूमिका घेतल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्‍थिती ‘धरलं तर चावतं अन्‌ सोडलं तर पळतं’ अशी झाली आहे. त्‍यामुळे सावंत यांनी हा प्रश्‍‍न केंद्राकडे उपस्‍थित करणे योग्‍य ठरेल. त्‍यांनी पंतप्रधानांकडे आयआयटीची जमीन कमी करण्‍याबाबत गोव्‍याची बाजू मांडावी व ज्‍या जागा उपलब्‍ध आहेत तेथे या केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्‍या कराव्‍यात, असे खोलकर म्‍हणाले.

दत्ता खोलकर, इंजिनिअर तथा भाजप सुकाणू समिती सदस्‍य-

सिंगापूरसारख्‍या शहरात कमी जमीन उपलब्‍ध असूनही तेथे जगातील सर्वांत उत्‍कृष्‍ट विद्यापीठे स्‍थापन करण्‍यात आलेली आहेत. उंच इमारती बांधून हा प्रश्‍‍न गोव्‍यातही सोडविता येऊ शकतो. शिक्षक वर्गासाठी बंगले बांधण्‍याऐवजी त्‍यांची सोय इमारती बांधून करता येते. 10 लाख चौरस मीटर जमीन घेऊन आयआयटीत 10 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे का?

अरुण बाबा नायक, केमिकल अभियंता-

गोव्‍याच्‍या प्रकृतीशी साधर्म्य राखणारे शैक्षणिक संकुल गोव्‍यात आणले जावे. आयआयटीला प्रचंड मोठी जमीन देऊन गोव्‍याचे काही भले होणार नाही. येथे गोवेकरांना क्षुल्लक रोजगार उपलब्‍ध होईल. दुकाने आणि उपाहारगृहे उभी करणे हा काही रोजगार म्‍हणता येणार नाही. गोव्‍यातील जागेची कमतरता लक्षात घेऊन शैक्षणिक संकुलाचे नवे नमुने तयार करणे भाग आहे आणि सरकारने त्‍या दृष्‍टीने कल्‍पकतेने विचार करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT