Goa E Bus  canva
गोवा

E Bus: लवकरच गोव्यात ५०० 'ई बसेस' धावणार; वाहतूकमंत्री गुदिन्हो यांची माहिती

Mauvin Godinho: आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेद्वारे ७०० कोटी रुपयांच्या ५०० बसेस मिळणार असल्याने राज्यातील तिजोरीवर कुठलाच दबाव येणार नाही आणि उत्कृष्ट सेवा मिळेल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Electric Bus

पणजी: आज राज्यात शाश्वत वाहतूक व्यवस्थेची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गोव्याला आयआयटी माजी विद्यार्थी परिषदेद्वारे ‘सीएसआर’अंतर्गत ७०० कोटी रुपयांच्या ५०० विजेवरील बसेस मिळणार असल्याने राज्यातील तिजोरीवर कुठलाच दबाव येणार नाही आणि आम्हाला उत्कृष्ट सेवा मिळेल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे. मुख्य सचिवांनी परिषदेला ‘सीएसआर’अंतर्गत बसेस देण्याची विनंती केल्यावर त्याची दखल घेऊन एका महिन्याच्या आत आम्हाला त्यांचा प्रतिसाद लाभला. लगेच त्यांची प्रतिक्रिया आल्यावर मंत्रिमंडळात यावर चर्चा झाली. यावरून सरकार वाहतूक विषयावर किती गांभीर्याने विचार करते, हे लक्षात येते.

५०० बसेस कधीपर्यंत मिळणार हे मात्र मंत्री गुदिन्हो यांनी दिली नाही. ते म्हणाले की, वेळ अजून ठरलेली नाही; परंतु आम्ही लवकरात लवकर कागदोपत्री व्यवहार पूर्ण करणार आहोत. या बसेस आल्यावर त्या कदंब वाहतूक महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येतील.

गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसेस लवकर मिळाव्यात आणि व्यवहार सुरळीत व्हावा, यासाठी विशेष मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळामध्ये ४ सदस्य परिषदेचे असणार आहेत, तर ४ सदस्य वाहतूक विभागातील अधिकारी असणार आहेत.

राज्यात चार्जिंग स्टेशन्स उभारणार

‘सीएसआर’अंतर्गत ५०० विजेवरील बसेस राज्याला मिळणार आहेत. त्यासोबतच चार्जिंग स्टेशन देखील उभारले जाणार आहेत. आम्हाला सर्व सोयी मोफत मिळणार आहेत. यापुढे देखील अशाच प्रकारे सीएसआर अंतर्गत परिषद आम्हाला सहकार्य करील, अशी आशा मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT