Goa IIT project Dainik Gomantak
गोवा

Goa IIT Project: धारगळ, लोलये ते कोडार! ‘आयआयटी’ला राज्यात 10 ठिकाणी नकारघंटा; सरकारसमोर पेच

IIT Project Goa: आयआयटी शैक्षणिक संकुल प्रकल्प राबवण्यात राज्यात तब्बल १० ठिकाणी सरकारला अपयश आल्याने आता तो प्रकल्प न्यावा तरी कुठे, असा पेच सरकारला पडला आहे.

Sameer Panditrao

पणजी: आयआयटी शैक्षणिक संकुल प्रकल्प राबवण्यात राज्यात तब्बल १० ठिकाणी सरकारला अपयश आल्याने आता तो प्रकल्प न्यावा तरी कुठे, असा पेच सरकारला पडला आहे.

फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकुलात २०१६ सालापासून आयआयटीचे वर्ग भरत असले तरी त्यांना कायमस्वरूपी संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात सरकारला अपयश आले आहे.

धारगळ येथील जागा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पसंत पडली नाही. रिवण येथील जागेची कागदपत्रे व्यवस्थित नव्हती, तर उर्वरित ८ ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे सरकारला तेथे आयआयटी संकुलाला जागा देण्याच्या निर्णयापासून माघारी फिरावे लागले आहे.

गोव्यासोबत सुरू झालेल्या आयआयटी संकुलांच्या विस्ताराची योजना केंद्र सरकारने राबवणे सुरू केले असतानाच गोव्यात मात्र आयआयटीचे संकुलच उभे राहिले नसल्याने या सुविधेपासून वंचित रहावे लागले आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून आयआयटी संकुलासाठी जागा निश्‍चितीचा रेटा राज्य सरकारवर वाढत आहे.

वर्ष सुचवलेली जागा

२०१४ धारगळ

२०१५ बेतकी-खांडोळा

२०१६ लोलये

२०१७ उसगाव

२०१७ धारबांदोडा

२०१७ कोटार्ली

२०१९ मेळावली

२०२२ कोटार्ली

२०२३ रिवण

२०२५ कोडार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी गोव्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या आयोजनात सध्या आयआयटीच्या विषयाकडे लक्ष देणे जमलेले नाही. एकदा तो कार्यक्रम झाला, की आयआयटीविषयी निर्णय घेण्यात येईल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT