BJP spokesperson Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: आपने हातघाईचे राजकारण केल्यास जशास तसे उत्तर देऊ : भाजपचा इशारा

आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे प्रवक्ते दामू नाईक (BJP spokesperson Damu Naik) यांनी आज दिला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: लोकशाहीत दुसऱ्या पक्षाच्या धोरणांना विरोध करण्याचा अधिकार सर्वानाच आहे. पण आमदारांच्या घरावर मोर्चा नेऊन राडा करण्याचा अधिकार कुणालाही नाही. जर आप पक्षाने (Aam Aadmi Party) असेच हातघाईचे राजकारण केल्यास त्याना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे प्रवक्ते दामू नाईक (BJP spokesperson Damu Naik) यांनी आज दिला.

नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डीसा (Wilfred Deesa) यांच्या घरावर आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima Coutinho) यांनी मोर्चा आणल्यावर जो हंगामा झाला त्यावर सध्या गोव्यात उलटसुलट चर्चा चालू असताना आज भाजपने पलटवार केला. प्रदेश समितीचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी आपच्या या मोर्चाचा निषेध करताना, आप गोव्यात घाणेरडी राजकीय संस्कृती आणू पाहत आहे. त्यांचे हे प्रकार आम्ही खपवून घेऊ या भ्रमात त्यांनी राहू नये, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसचे 10 आमदार भाजपात येणे ही त्यावेळची गरज होती. गोव्यात माजलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि गोवा विकायला निघालेल्या काही मंत्र्यांना वेसण घालण्यासाठी त्या असमदारांना भाजपात सामावून घेणे गरजेचे होते. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते भाजपात आले होते असे नाईक यांनी सांगितले. त्या आमदारांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचा निर्णय त्या त्या मतदारसंघातील मतदार घेतील. त्यात आपला नाक खुपसण्याची गरज नाही असे नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT