I-League Football Dainik Gomantak
गोवा

I-League Football Tournament: रंगदाजिएद युनायटेडला बरोबरीत रोखत धेंपो क्लब गटात अव्वल

I-League Football Tournament: तृतीय श्रेणी आय-लीग: रंगदाजिएद युनायटेडविरुद्ध एका गुणाची कमाई

किशोर पेटकर

I-League Football Tournament: तृतीय श्रेणी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या धेंपो स्पोर्टस क्लबने मंगळवारी मेघालयाच्या रंगदाजिएद युनायटेडला गोलशून्य बरोबरीत रोखले. यामुळे गोव्यातील संघाने क गटातील अव्वल स्थान कायम राखले. सामना एला-जुने गोवे येथील मैदानावर झाला.

गटात अग्रस्थानी राहिल्यामुळे धेंपो क्लबची स्पर्धेची पुढील फेरीही निश्चित झाली आहे. त्यांनी चार लढतीत तीन विजय व एका बरोबरीसह सर्वाधिक 10 गुणांची कमाई केली. धेंपो क्लबला मंगळवारी बरोबरीचा एक गुण पुरेसा होता. रंगदाजिएद युनायटेडची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली.

त्यामुळे त्यांचे चार लढतीनंतर आठ गुण झाला व गटात दुसरा क्रमांक मिळाला. या गटात कर्नाटकच्या किकस्टार्ट एफसीचे चार लढतीतून सात गुण, तर जेप्पियार इन्स्टिट्यूट संघाने तीन गुण झाले. मिल्लात एफसी संघाला चारही सामन्यांत पराभूत व्हावे लागले.

आय-लीगच्या तृतीय श्रेणीत गोव्याचा आणखी एक संघ स्पोर्टिंग क्लब द गोवाने चार सामन्यांत 10 गुण नोंदवत 'अ' गटातून पुढील फेरी यापूर्वीच गाठली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT