U-19 Girls Cricket: गोव्याच्या मुलींचा सिक्कीमविरुद्ध सात विकेट राखून पराभव

हरियानातील झज्जर येथील सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मैदानावर झालेल्या लढतीत गोव्याला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
U-19 Girls Cricket
U-19 Girls CricketDainik Gomantak

U19 Girls Cricket: गोव्याच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने मंगळवारी ८३ धावा केल्या, पण त्यात अवांतर ५६ धावा उच्चांकी ठरल्या. त्यानंतरही एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सिक्कीमकडूनही सात विकेट राखून पराभव पत्करावा लागला.

हरियानातील झज्जर येथील सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मैदानावर झालेल्या लढतीत गोव्याला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. बंगालविरुद्ध ८, तमिळनाडूविरुद्ध २३ धावांत गारद झालेल्या गोव्याला सिक्कीमविरुद्ध किमान पाऊणशे धावा केल्याचे आणि डावातील सर्व ३५ षटके खेळल्याचे समाधान लाभले, परंतु विजय नोंदविणे काही शक्य झाले नाही. वैयक्तिक पातळीवर गोव्यातर्फे शिल्पा शर्मा हिने सर्वाधिक १३ धावा नोंदविल्या. तिने ६८ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला.

गोव्याच्या डावातील ५६ अवांतर धावांत ४३ वाईड, १२ नोबॉल, १ लेगबाय धावेचा समावेश होता. सिक्कीमलाही ४१ अवांतर धावांचा लाभ झाला. यामध्ये ३६ वाईड, ४ नोबॉल, १ बाईज धावेचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक

गोवा: ३५ षटकांत ८ बाद ८४ (गायत्री गावकर ०, कामाक्षी धारवाडकर ०, दिशा देसाई ०, दिलेशा डिचोलकर ५, विधी भांडारे ४, किमया पाठक ४, प्रगती भोसले ०, नंदिनी चौहान ०, शिल्पा शर्मा नाबाद १३, सान्वी गावस नाबाद २, कुसंगमीत २०-२, प्रेणू १५-३)

पराभूत वि. सिक्कीम: २६.२ षटकांत ३ बाद ८५ (आकृती २६, तनिशा वेळीप २-०-२३-०, विधी भांडारे ७-३-१४-०, किमया पाठक ७-१-२१-२, सान्वी गावस ७-०-१६-१, नंदिनी चौहान २-१-५-०, दिशा देसाई १.२-०-५-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com