Sudesh Mayenkar Dainik Gomantak
गोवा

Goa: मी लोबोंच्या विरोधात निवडणूक लढण्यास सक्षम : सुदेश मयेंकर

भाजपचे निष्ठावंत सुदेश मयेंकर (Sudesh Mayenkar) यांनी कळंगुटात सांगितले.

दैनिक गोमन्तक

2002 पासून मी  भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे अगदी तळागाळापासून काम करीत येथपर्यंत आलेलो आहे. मंत्री मायकल लोबो (Minister Michael Lobo) यांच्याशी माझा वैयक्तिक वाद निर्माण झालेला असल्याने  स्वाभिमानी कळंगुटकर  या नात्याने  पुन्हां त्यांच्याशी जुळवून घेणे अथवा एकत्रित येणे आता शक्य होणार नाही त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कळंगुटातून माझा विचार केल्यास मी मंत्री लोबो यांच्या विरोधात लढा देण्यास सक्षम असल्याचे प्रतिपादन कळंगुटचे पंच सदस्य तथा भाजपचे निष्ठावंत सुदेश मयेंकर (Sudesh Mayenkar) यांनी कळंगुटात सांगितले.

दरम्यान, भाजपच्या कळंगुट गोटात सर्वकाही ठीकठाक चाललेले असतांना मी पुढाकार घेत केशव सेवा साधना तर्फे कोवीड बाधितांच्या सोयीसाठी कोवीड सेंटर सुरु केले हीच गोष्ट मंत्री लोबो यांना खटकली, या गोष्टीवरुन त्यांनी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यरित्या मला वेळोवेळी दुखावण्याचा प्रयत्न केला परंतु मी एक सच्चा भाजप कार्यकर्ता असल्याने त्या गोष्टीकडे कानाडोळा केला.

सरतेशेवटी माझ्या विरोधात खतांच्या वाटपावरून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आणी आमच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आता पुन्हा एकत्रित येणे शक्य नाही असे मयेंकर यांनी सांगितले. माझ्या आतापर्यतच्या  कार्याची माहिती भाजपचे जेष्ठ सतीश धोंड तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बर्यापैकी आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कऴगुटातून भाजपच्या तिकीटावर लढण्याची संधी मिळाल्यास  मायकल लोबो यांच्यासमोर दोन हात करण्यास मी सक्षम आणी समर्थ असल्याचे सुदेश मयेंकर यांनी दै. गोमंतकशी बोलतांना निक्षून सांगितले.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT