GHRDC Recruitment Dainik Gomantak
गोवा

GHRDC Recruitment: 'मनुष्यबळ'तर्फे भरणार 740 जागा! वेर्णा येथे 23 रोजी रोजगार मेळावा; युवकांसाठी मोठी संधी

GHRDC recruitment 740 posts: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे (जीएचआरडीसी) विविध क्षेत्रांतील तब्बल ७४० पदे भरली जाणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे (जीएचआरडीसी) विविध क्षेत्रांतील तब्बल ७४० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी २३ एप्रिल रोजी वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

या मेळाव्यात टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, मेंटेनन्स टेक्निशियन, प्रॉडक्शन टेक्निशियन, असेंब्ली लाईन टेक्निशियन, ज्युनियर टेक्निशियन, सर्व्हिस टेक्निशियन अशा सुमारे १५० पदांसाठी भरती होणार असून, त्यासाठी आयटीआय पात्रता आवश्यक आहे.

डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी, ज्युनियर इंजिनियर, टेक्निशियन, सुपरवायझर या सुमारे १२० पदांसाठी अभियांत्रिकी पदविका आवश्यक आहे. तसेच ग्रॅज्युएट इंजिनियर, ट्रेनी इंजिनियर, डिझाइन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर या सुमारे ४० पदांसाठी अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.

सिनियर इंजिनियर, आर अँड डी इंजिनियर, लीड इंजिनियर, टेक्निकल सपोर्ट या १५ पदांसाठी अभियांत्रिकी पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे. फार्मासिस्ट व फार्मसी असिस्टंटची ७५ पदे, तसेच प्रॉडक्शन एक्झिक्युटिव, क्यूसी एक्झिक्युटिव, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांची १०० पदे भरली जाणार असून, त्यासाठी फार्मसी पदवी आवश्यक आहे.

याशिवाय फार्मसी क्षेत्रातील रिसर्च सायंटिस्ट, क्यूए मॅनेजर, रेग्युलेटरी मॅनेजर या १०० पदांसाठी भरती होणार आहे. लॅब टेक्निशियन, क्वालिटी ॲनालिस्ट, प्रॉडक्शन एक्झिक्युटिव या ४० पदांसाठी विज्ञान पदवी आवश्यक आहे, तर सायंटिस्ट, सिनियर अॅनालिस्ट, लॅब मॅनेजर या २५ पदांसाठी विज्ञान पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे.

अकाउंट्स एक्झिक्युटिव, बिलिंग एक्झिक्युटिव, अकाउंटंट या २० पदांसाठी वाणिज्य पदवी आवश्यक आहे, तर सिनीयर अकाउंटंट, फायनान्स एक्झिक्युटिव, अकाउंट्स मॅनेजर या १० पदांसाठी उच्च पात्रता आवश्यक आहे. मॅनेजमेंट ट्रेनी, मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या २० पदांसाठी बीबीए/एमबीए पात्रता आवश्यक आहे. ऑफिस एक्झिक्युटिव, एचआर एक्झिक्युटिव, कस्टमर सपोर्ट या १५ पदांसाठी कला पदवीधरांना संधी आहे, तर सिनीयर एचआर एक्झिक्युटिव, ट्रेनर, रिसर्च ॲनालिस्ट या १० पदांसाठी कला पदव्युत्तर उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची उद्योग प्रतिनिधींशी बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील उद्योग प्रतिनिधींसोबत या मेळाव्याबाबत नुकतीच बैठक घेतली. स्थानिक रोजगार वाढवणे आणि उद्योग-सरकार यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करणे यावर भर देण्यात आला. या बैठकीस वेर्णा उद्योग संघटनेचे अध्यक्ष कल्पक आरवरे, उपाध्यक्ष प्रमोद सुलाखे, गोवा राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कॉस्ता उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT