Goa HSSC Result 2026 Dainik Gomantak
गोवा

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Goa Board 12th Result 2026: गोवा बोर्डाच्या (GBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, २१ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा बोर्डाच्या (GBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, २१ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांमधील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य आज स्पष्ट होणार असून, निकालानंतर लगेचच गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल.

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल गोवा बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच gbshse.in वर पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर (Seat Number), शाळा निर्देशांक (School Index) आणि नोंदणी क्रमांक (Registration Index) तयार ठेवणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिका पाहू आणि डाऊनलोड करू शकतील. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यभरातील विविध केंद्रांवर पार पडली होती.

गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

१. सर्वप्रथम गोवा बोर्डाच्या gbshse.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. २. होमपेजवर असलेल्या 'Results' या टॅबवर क्लिक करा. ३. त्यानंतर 'Examination Results' निवडून 'HSSC Results' वर क्लिक करा. ४. आता तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर अचूक भरा. ५. 'Get Result' वर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. ६. पुढील संदर्भासाठी निकालाची प्रिंट काढून घ्या किंवा पीडीएफ सेव्ह करा.

एसएमएस (SMS) द्वारेही निकाल मिळवण्याची सोय

विद्यार्थी एसएमएसद्वारेही आपला निकाल पाहू शकतात. यासाठी आपल्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन खालीलप्रमाणे मेसेज टाईप करा:

  • GOA12 <स्पेस> तुमचा सीट नंबर आणि हा मेसेज 56263 / 58888 / 5676750 / 54242 या क्रमांकावर पाठवा.

  • अथवा GB12 <स्पेस> तुमचा सीट नंबर टाईप करून 54242 वर पाठवा.

निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी आपली मूळ गुणपत्रिका शाळेतून घेण्यापूर्वी ही ऑनलाईन प्रत सुरक्षित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT