Honey Trap  Dainik Gomantak
गोवा

Goa Honey Trap Case: कळंगुट-कोलवाळ पोलिसांकडील हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक

12 सदस्यीय पथक: दोन प्रकरणांचा होणार तपास

गोमन्तक डिजिटल टीम

Honey Trap Case In Goa पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणांच्‍या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक तयार केले आहे. 12 सदस्यीय पथकाचे नेतृत्व उपमहानिरीक्षक अस्लम खान, क्राईम ब्रँच पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्याकडे देण्यात आले असून कळंगुट व कोलवाळ पोलिसांत नोंदवण्यात आलेल्या हनी ट्रॅपच्या दोन प्रकरणांचा तपास हे पथक करणार आहे.

12 सदस्यीय विशेष चौकशी पथकात पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक सुदेश नाईक, निरीक्षक राहुल परब, जॉन फर्नांडिस, सतीश पडवळकर, रिमा नाईक, उपनिरीक्षक सोनम वेरेकर, प्रगती मळीक व दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

एका गुजरात येथील फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर 23 वर्षीय दोन युवतींसह एका युवकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणांची चौकशी एसआयटी करणार आहे.

‘डेट’वर जाऊन मागितली खंडणी

‘डेट’ला जाऊन पुरुषांना तक्रार करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणे, अशा कळंगुट व कोलवाळ पोलिसांत नोंदवलेल्या गुन्ह्यांचा तपास हे एसआयटी पथक करणार आहे.

विमान प्रवासावेळी संशयितासोबत ओळख झाली आणि हॉटेलवर बोलावून आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार गुजराती युवतीने कोलवाळ पोलिसांत दाखल केला होती. त्यानुसार संशयित लक्ष्मणभाई शियार (45, रा. गुजरात) यास पोलिसांनी अटक केली होती.

बलात्काराची धमकी

पोलिसांनी केलेल्या तपासात ही युवती पुरुषांसोबत ‘डेट’ला जाऊन पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचे समोर आले. असेच दुसरे प्रकरण कळंगुट पोलिसांत दाखल झाले होते.

या प्रकरणात ‘डेटींग अ‍ॅप’मार्फत पुरुषांशी संपर्क साधून मोबाईलवर चॅटींग करून ब्लॅकमेल करणे तसेच खंडणी मागणे आणि पैसे न दिल्यास पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवण्याची धमकी युवती देत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT