Honda Village, Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त होंडा गावात रोजगार भरती मेळावा

मुख्यमंत्री (Goa CM) डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या(Goa Government)गोव्यातील(Goa) या उपक्रमाचे स्वागत करून धन्यवाद दिले आहे.

दैनिक गोमन्तक

राज्य (State) सरकारने (Goa Government) सुरू केलेल्या कौशल्य विकास (Skill development) व उद्योजकता (Entrepreneurship) संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त होंडा (Honda Village), सत्तरी(Sattari) येथिल औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (Training Center) डिचोली (Bicholim) आणि सत्तरी तालुका मर्यादित राज्यातील विविध खाजगी कंपन्यां तसेच सरकारी महामंडळात रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार (Employment) भरती मेळावा आयोजित करून सुमारे 217 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या प्रशिक्षणार्थींनी कोव्हीड 19 माहामारीच्या काळात एकाच छताखाली कंपन्यांना आमंत्रित करून मुलाखती देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने मुख्यमंत्री(CM) डॉ. प्रमोद सावंत सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करून धन्यवाद दिले आहे.

होंडा सत्तरी येथिल औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या व्यासपीठावर आय. एम. सीचे अध्यक्ष सिताराम गावस, होंडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य निलेश गावस, डिचोली केंद्राचे प्राचार्य कपिल आयकर, प्रशिक्षक अशोक मन्सुर, संजीव नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आय एम सीचे अध्यक्ष सिताराम गावस म्हणाले की विद्यमान सरकार हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना आखीत आहे, त्यानुसार आजच्या या जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे, त्यामुळे सरकारांची युवा प्रती असलेली गंभीरता दिसून येत आहे, सदर स्वरूपाचे मेळावे आयोजित करून सरकार युवकांना खाजगी कंपन्यांत रोजगार मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडीत आहे, याचा लाभ प्रशिक्षित युवा पीढीने घ्यावा असे आवाहन केले

गेल्या एक वर्षापासून जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वत्र निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे शिक्षणातील इतर क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे, पण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने कोव्हीड 19 माहामारीच्या काळात सुद्धा गेल्या सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन न थांबता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारच्या कौशल्य विकास संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे प्रशिक्षण देऊन बेरोजगार असलेल्या प्रशिक्षणार्थींना यांचा लाभ होत आहे असे डिचोली प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य कपिल आयकर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

त्याच प्रमाणे या कार्यक्रमांची संधी साधून सत्तरी व डिचोली तालुक्यातील प औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतून विशेष श्रेणी प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली, त्याच प्रमाणे एकुण आठ प्रशिक्षणार्थींना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत एक वर्षाच्या काळासाठी एप्रेंटिस म्हणून समावेश करून घेतले आहेत. समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान या रोजगार भरती मेळाव्यात राज्यातील नामवंत कंपन्या पैकी वेदांत, नेस्ले, आदीसह कंदबा महामंडळ सुद्धा सामिल झाले होते.

राज्य सरकारने कोव्हीड काळात एकाच छताखाली कंपन्यांना आमंत्रित करून मुलाखती देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने आम्हाला आनंद झाला आहे, यासाठी सरकारचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया रूषिकेश नाईक या मुलाखतीला आलेल्या प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.

एरवी कोव्हीड महामारीच्या काळात दुरवर मुलाखतीला जाण्यासाठी धोका वाटत होता, पण सरकारने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात रोजगार भरती मेळावा आयोजित केला त्यामुळे आपल्या इच्छेनुसार मुलाखत देण्यास सोयीस्कर झाले, त्यामुळे सरकाराचे आभार अशी प्रतिक्रिया वैभव दळवी यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT