court  Dainik Gomantak
गोवा

Goa Car Fire Case: मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच! होंडाचे सरपंच शिवदास माडकर यांची जामिनासाठी कोर्टात धाव; पोलिस भलत्यांनाच पकडतायेत!

Shivdas Madkar Pre Arrest Bail: होंडा येथील पोलिस चौकीसमोर कार पेटवल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होंडाचे सरपंच शिवदास माडकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: होंडा येथील पोलिस चौकीसमोर कार पेटवल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होंडाचे सरपंच शिवदास माडकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

माडकर यांच्या शोधात पोलिस आहेत. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला सोडून पोलिस भलत्यांनाच पकडत असल्‍याचा आरोप केला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) माडकर आणि पंच कृष्णा गावकर यांना २७ रोजीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीआधी अटक केल्यास पोलिसांनी त्यांची प्रत्येकी २० हजार रुपयांच्या हमीवर सुटका करावी, असा अंतरिम आदेश दिला आहे.

याप्रकरणी तक्रारदार रूपेश पोके यांनी सुरुवातीला आपली काही तक्रार नाही, असे पोलिसांसमक्ष लिहून दिले होते. मात्र, सोमवारी त्यांनी ई-मेलद्वारे पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांची चक्रे हलू लागली. तक्रारीत त्यांनी कृष्णा गावकर, शिवदास माडकर, गौतम पार्सेकर आणि इतर सात ओळखीचे तसेच सुमारे ४०० अनोळखी व्यक्तींनी एकत्र येऊन बेकायदा जमाव केला. या जमावाने होंडा पोलिस चौकी परिसरात जबरदस्तीने घुसून तक्रारदारास धमकावले, मारहाण केली आणि त्यांच्या वाहनाचे नुकसान केले, असा आरोप केला आहे. दिवाळीच्या पूर्वरात्री झालेल्या वादातून उफाळलेल्या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. सरपंच माडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळे हे प्रकरण थंडावण्याची शक्यता आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पंचायत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून कारवाई सुरू केली आहे. फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींना एकामागून एक चौकशीसाठी बोलावून ताब्यात घेण्याचे सत्र सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठजणांना अटक केली असून, आणखी काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुख्य सूत्रधार सापडत नसतानाच याप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांपैकी एकाची पोलिस कोठडी मिळवण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. काल (मंगळवारी) या प्रकरणातील तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली होती. ती उद्या (गुरुवारी) संपते, तर आज पाचजणांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्या पाचपैकी एकाच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी वाळपईच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केली होती.

...तर हमी घेऊन मुक्तता

दरम्यानच्या काळात माडकर आणि गावकर यांना अटक करू नये, असा अंतरिम आदेश देण्याची विनंती त्यांचे वकील विनायक पोरोब यांनी केल्यावर न्यायालयाने दोघांनाही अटक केल्यास हमी घेऊन सोडावे, असा आदेश दिला.

जामीन अर्जावर २७ रोजी सुनावणी

यानंतर पोलिसांनी ८ जणांना अटक केली. या प्रकरणात अटकेची (Arrested) शक्यता असलेले सरपंच माडकर हे अद्याप बेपत्ता आहेत. त्यांनी आज वकिलामार्फत पणजी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी असल्यामुळे या अर्जावर सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT