Holi celebrations Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Holi 2025 Party: डीजे आणि पूल पार्टीची धम्माल; विकेंडला गोव्यात 'या ठिकाणी' लूटा होळीची आनंद

Goa Holi Party Venue: जाणून घेऊया गोव्यात नक्की कुठे सुरुये पार्टी?

Akshata Chhatre

Holi 2025 Party Venue in Goa: गोव्याच्या किनाऱ्यांवरील होळीचा रंग यंदाच्यावर्षी अधिकच गडद झालाय. शुक्रवारी मिळालेल्या सुट्टीमुळे लाँग वीकेंडचा पुरेपूर फायदा घेत, पर्यटकांनी आणि स्थानिकांनी रंगांच्या धुंदीत धमाल उडवायला सुरुवात केलीये. यंदाच्यावर्षी गोव्यातील विविध ठिकाणी होळीची पार्टी आयोजित केली गेलीये. तुम्ही जर का गोव्याच्या किनाऱ्यांवर असाल तर तुम्ही देखील याचा भाग बानू शकता. चला मग जाणून घेऊया गोव्यात नक्की कुठे सुरुये पार्टी?

1. जिप्सी बीच क्लब (Gypsea Beach Club Anjuna)

हणजूणच्या 'जिप्सी बीच क्लब'मध्ये तीन दिवस चाललेल्या 'बोली होली' पार्टीत डीजे रायन नोगा, डीजे शेमलेस मणी आणि डीजे ट्रॅपरक्सने आपल्या दमदार संगीताने सगळ्यांना थिरकायला भाग पाडले. ही पार्टी १४, १५ आणि १६ असे तीन दिवस असेल. जिप्सी बीचक्लब हणजूण इथे रात्री ८ वाजल्यापासून ही पार्टी सुरु होईल.

2. रंगहोलिक (Raj eco farms in Saleli)

'रंगहोलिक' पार्टीमध्ये 'गोवन वहिनी' म्हणजेच श्रद्धा शिरोडकर यांच्यासोबत स्थानिक डीजे आणि लाईव्ह बँडने रंगात रंग भरतील.

'राज इको फार्म'मध्ये आयोजित केलेल्या पार्टीत उर्राकच्या स्पेशल ड्रिंकने लोकांना अक्षरशः वेड लावेल. ही पार्टी राज इकोफार्म, सालेली इथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.

3. कलर्स ऑफ लव्ह (LPK Opn Air Candolim)

'एलपीके वॉटरफ्रंट'मध्ये 'कलर्स ऑफ लव्ह' पार्टीमध्ये रेन डान्स, फटाक्यांची आतषबाजी आणि 'सेव्हन नोट्स' बँडच्या लाईव्ह परफॉर्मन्स असतील. इथे महिलांसाठी मोफत प्रवेश आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याने अधिकाधिक महिलावर्ग या पार्टीला हजर असण्याची शक्यता आहे. ही पार्टी सकाळी ११ ते संध्याकळी ७ वाजेपर्यंत कांदोळी येथे होईल.

4. होळी बॅश (Indismart Woodbourne Resort Nuvem)

'इंडिस्मार्ट वुडबर्न रिसॉर्ट'मध्ये 'होळी बॅश' २०२५'मध्ये डीजे जॉनी, डीजे जोएल, डीजे रायन नोगा, एके ४७, डीजे हर्षा आणि केके सोनिक उपस्थित असणार आहेत. इंडिजमार्ट वुडबॉर्न रिसॉर्ट, नुवे इथे सकाळी १० वाजल्यापासून होळीची पार्टी सुरु होणार आहे. भर उन्हाळ्याची दिवसांत ही पूल पार्टी नक्कीच आकर्षणाचे केंद्र ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT