Houses collapsed due to falling tree Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

Goa Unseasonal Rain: पंधरा दिवसात पावसाळ्यामुळे झालेल्या हानीशिवाय आगीचे तसेच इतर घटनांचे 422 कॉल्स आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Unseasonal Rain

राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळीवाऱ्यासह पडणाऱ्या या पावसामुळे अनेक भागामध्ये झाडे व विजेचे खांब रस्त्यावर व घरावंर पडण्याची घटना घडल्या आहेत.

गेल्या 15 दिवसांत (04 ते 19 मे) या काळात पावसाळामुळे झालेल्या पडझडीचे अग्निशमन दलाला 130 कॉल्स आले आहेत. या पावसामुळे सुमारे 26.29 लाखांचे नुकसान झाले

असून सुमारे 33.76 लाखांची मालमत्ता वाचवण्यात दलाच्या जवानांना यश आले असल्याची माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी (दि.19) संध्याकाळी पाऊस सुरू झाला तेव्हा 11 कॉल्स आले. मात्र, मोठीशी हानी झालेली नाही.

पावसाबरोबर वादळीवारे नसल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झाली नाही. काही दिवसांपूर्वी राज्यात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला होता. त्यावेळी रस्त्यावर झाडे व विजेचे खांब मोडून पडले होते.

आगीव्यतिरिक्त घटनांचे 422 कॉल्स

पंधरा दिवसात पावसाळ्यामुळे झालेल्या हानीशिवाय आगीचे तसेच इतर घटनांचे 422 कॉल्स आले. त्यातील अर्धे कॉल्स हे पावसाशी संबंधित होते. नियंत्रण कक्षाकडे गेल्या 24 तासात 14 कॉल्स आले, त्यात 07 आगीचे तर 07 आपत्कालिन होते. पावसामुळे हानीचा एकही कॉल नोंद नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT