Goa Assembly 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly 2023: मंदिरांची सुरक्षा अबाधित; रस्ता रुंदीकरणामध्ये सरकारने घेतलाय 'हा' महत्वपूर्ण निर्णय

नीलेश काब्राल : भोमा व खोर्ली येथील केवळ आठ घरे बाधित; पुनर्वसन करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session: राष्ट्रीय महामार्ग ४ अ पणजी-मोले-बेळगाव यावरील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणांमध्ये भोमा आणि खोर्ली या गावातील प्रत्येकी ४ घरे बाधित होत असून या घरमालकांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादन आणि भूखंड प्रस्तावित केले आहेत.

या रस्ता रुंदीकरणामध्ये मंदिरे पाडली जाणार नाहीत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी मंगळवारी (ता.८) सभागृहात दिली.

वीरेश बोरकर, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा आणि व्हेंझी व्हिएगस यांनी ही लक्षवेधी मांडली. या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे या दोन्ही गावांमधील मोठ्या प्रमाणात घरे आणि मंदिरे पाडली जातील, अशी भीती व्यक्त केली होती, यावर मंत्री काब्राल बोलत होते.

एकूण 22 बांधकामांचा ठरतोय अडथळा

1. काब्राल म्हणाले, भोमा गावातील सध्याच्या महामार्गाच्या डाव्या काठावर जेथे मंदिरे नाहीत तिथून हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामुळे एकूण २२ वास्तू बाधित आहेत. त्यापैकी केवळ ४ निवासी घरे आहेत. उर्वरित तात्पुरती बांधकामे आहेत.

2. खोर्ली गावात ३९ बांधकामे बाधित आहेत. त्यापैकी ४ जुनी निवासी घरे आहेत. यातील अनेक बांधकामे बेकायदेशीर आहेत. तरीही भोमा गावासमोरील बाधित दुकाने आणि इतर बांधकामाचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा मानस आहे.

मंदिराच्या परिसरात, उजव्या बाजूच्या बाधित ४ घरांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादन आणि भूखंड प्रस्तावित आहे. खोर्ली गावातील ४ घरांच्या पुनर्वसनासाठी दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र भूखंडांची तरतूद आहे.

यावेळी स्वतंत्र पूल उभारून रस्ते करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुलाखालील परिसरही नागरिकांना वापरता येणार आहे. याशिवाय नागरिकांच्या उपजीविकेची कोणतीच साधने यामुळे नष्ट होणार नाहीत. - नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Today Live Updates: डिचोलीत 24 नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT