High Court PIL Mala Lake dead fish Dainik Gomantak
गोवा

मृत मासेप्रकरणी न्यायालयाची स्वेच्छा दखल, सोमवारी सुनावणी; आरोग्‍य संचालनालयासह प्रतिवादींना स्‍पष्‍टीकरणाचे निर्देश

High Court PIL Mala Lake dead fish: मळा तलावातील जलसाठ्यावर मृत मासे तरंगताना आढळल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मळा तलावातील जलसाठ्यावर मृत मासे तरंगताना आढळल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणावर सोमवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे.

तलावात ११ एप्रिल रोजी मृत मासे तरंगताना आढळले होते. ही घटना चिंताजनक असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पुढाकार घेत न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस आणि न्यायमूर्ती अमित एस. जामसंडेकर यांच्या खंडपीठाने हे प्रकरण नोंदवून घेतले.

या घटनेमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याच्या धोक्यांबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उत्तर गोवा आरोग्य सेवा संचालनालय तसेच अन्य संबंधित प्रतिवादींना देण्यात आले आहेत.

दरम्यान, पणजी परिसरातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेल्या या तलावातील प्रदूषण आणि पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष याविषयी वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा हस्तक्षेप केला आहे.

दूषित पाण्‍यामुळे मृत्‍यूचा संशय

मळा येथील तलावातील पाणी दूषित झाल्‍याने माशांना पुरेसा ऑक्‍सिजन न मिळाल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचा संशय मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि महापौर रोहित मोन्‍सेरात यांनी घटनेनंतर व्‍यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

SCROLL FOR NEXT