Cape Bicholim Cow Transport Dainik Gomantak
गोवा

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Dhyan Foundation Gaushal: वाहतुकीदरम्यान गुरांना कोणताही त्रास होणार नाही आणि सर्व कायदेशीर नियमांचे कठोर पालन केले जाईल, अशी खात्री राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: केपे येथील ध्यान फाउंडेशन संचलित गोशाळेतून गुरांचे डिचोली येथील सरकारी अधिकृत गोशाळेत स्थलांतर करताना समोर आलेल्या अत्यंत त्रासदायक आणि चिंताजनक व्हिडिओंची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.

या वाहतुकीदरम्यान गुरांना कोणताही त्रास होणार नाही आणि सर्व कायदेशीर नियमांचे कठोर पालन केले जाईल, अशी खात्री राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान, गुरांच्या वाहतुकीवर अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा नकार दिला असून, केपे येथील उर्वरित २० ते २५ गुरांचेही सुरक्षित स्थलांतर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोशल मीडियावर आणि न्यायालयात सादर करण्यात आलेल्या काही व्हिडिओंमध्ये गुरांचे स्थलांतर अत्यंत निर्दयपणे व घाईगडबडीत होत असल्याचे दिसून आले होते, ज्यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर खंडपीठाने स्पष्ट केले की, प्राण्यांना कोणतीही इजा किंवा त्रास न होता हे स्थलांतर पार पडले पाहिजे. याचिकाकर्त्या ध्यान फाउंडेशननेदेखील या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करावे, जेणेकरून गुरांना वाहतुकीदरम्यान त्रास होणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुढील सुनावणी ३ ऑगस्टला

सरकारी वकील ॲड. प्रवीण फळदेसाई यांनी न्यायालयातील घडामोडींची माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलेली वेळ संपल्यानंतरही त्यांनी कोणताही आराखडा दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने उरलेली गुरे नियमित प्रक्रियेने हलवण्याचे निर्देश दिले आहेत. १०९ पैकी बहुतांश गुरांचे सुरक्षित स्थलांतर झाले असून केवळ २० ते २५ गुरे शिल्लक आहेत. समोर आलेले व्हिडिओ लक्षात घेऊन सरकारतर्फे अत्यंत काळजी आणि खबरदारी घेतली जाईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ३ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT