Birch By Romeo Lane Case Dainik Gomantak
गोवा

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमिओ लेन' प्रकरणात लुथरा बंधूंना हायकोर्टाचा दणका; जामीन रद्द, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचा आदेश

Birch By Romeo Lane bail cancelled: सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंजूर केलेल्या जामिनाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबचे मालक/भागीदार सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंजूर केलेल्या जामिनाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बर्च अग्निकांड प्रकरणानंतर हणजूण पोलिसांनी तिघांवरही गुन्हा नोंद केला होता.

तसेच, बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांत तिघांवरही गुन्हा नोंदविण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांत त्यांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तपासादरम्यान क्लब चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या नसल्याचे उघडकीस आल्यानंतर, हणजूण पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ वापरून उत्पादन शुल्क विभागाचा परवाना मिळवल्याचे समोर आले. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता.

नव्याने जामीन अर्ज करण्याची मुभा

आरोपींना नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून, सत्र न्यायालयाला या नव्या अर्जावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT