Bull Fight In Goa Dainik Gomantak
गोवा

Bull Fight In Goa: उच्च न्यायालयाचा आदेश; 'धिरयो' रोखण्यासाठी पोलिसांचं 'पुढचं पाऊल'...

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गोवा पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

Ganeshprasad Gogate

Bull Fight in Goa: मागील काही वर्षांपासून राज्यात अनेक ठिकाणी बैलांच्या बेकायदा झुंजी (धिरयो) लावल्या जातात. खरं तर या ‘धिरयो’ला बंदी असल्याने आणि पोलिस कारवाईच्या भीतीने सहसा धिरयो आयोजित केले जात नाहीत. पण अजूनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने धिरयोचे आयोजन केले जाते.

याच संदर्भात एक महत्वाची माहिती हाती येतेय, बेकायदेशीर बैलांच्या झुंजी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता गोवा पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक (112) जारी केला आहे.

या हेल्पलाईन नंबरवर बेकायदेशीर बैलांच्या झुंजीची तक्रार करण्यासाठी जागृत नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आलंय.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील ‘धिरयो’ रोखण्यासाठी पोलिस महासंचालकांनी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी राज्यात करण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काढले होते.

राज्यात ‘धिरयो’ला बंदी असून अनेक भागात त्या आयोजित केल्या जातात. अनेकदा या धिरयोमध्ये ज्या बैलांचा किंवा रेड्यांच्या झुंजी लावण्यात येतात त्याची जाहिरात डिजीटल प्लॅटफॉर्मवरून केली जाते.

या धिरयो सकाळी पहाटेच्या सुमारास आयोजित केल्या जातात.धिरयोच्या ठिकाणी पैजा लावण्यासाठी लोकांची गर्दी असते, तर काही पैजा या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात.

यावर आता कडक नजर ठेवण्यासाठी पोलीस खात्याने महत्वाचे पाऊल उचलले असून 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT