दिगंबर कामत यांच्‍या नाकर्तेपणामुळे आर्थिक राजधानी मडगावची वाट लागली; सरदेसाई म्हणाले आता पर्याय...

मडगावला पर्यायाची गरज असून भाजपचे कार्यकर्तेही पर्यायाच्या प्रतीक्षेत आहेत - आमदार विजय सरदेसाई
Vijai Sardesai
Vijai Sardesai
Published on
Updated on

Margao: मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या नाकर्तेपणामुळे राज्‍याची आर्थिक राजधानी असलेल्‍या मडगाव शहराची पूर्णत: वाट लागली असून आता पर्याय शोधण्याची गरज आहे. असे वक्‍तव्‍य फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी करून मडगावला सक्षम पर्याय देण्‍यासाठी आमचा गोवा फाॅरवर्ड सक्षम आहे असे सांगितले.

मडगावला पर्यायाची गरज असून भाजपचे कार्यकर्तेही पर्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मडगाव मरणपंथाला लागले असून त्‍याला वाचवण्याची वेळ आली आहे आणि आम्ही गोवा फॉरवर्ड निश्चितपणे मडगावकरांना पर्याय देऊ असे सरदेसाई म्हणाले.

पार्किंग प्रकल्‍पातील सध्‍या वादग्रस्‍त ठरलेल्‍या नियोजीत रेस्‍टॉरंटच्‍या प्रश्र्‍नावर बोलताना दिगंबर कामत यांना त्‍यांच्‍याच नगराध्‍यक्षांनी उघडे पाडले आहे. हे रेस्‍टॉरंट येणार असे काही दिवसांपूर्वी दिगंबर यांनी जाहीर केलेल्या रेस्टॉरंटच्या प्रश्नांवर त्यांच्याच गटाचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी असा कसला प्रस्‍तावच पालिकेने सादर केलेला नाही असे सांगितले आहे.

माजी नगराध्‍यक्ष लिंडन परेरा व घनश्‍‍याम शिरोडकर यांनीही यावर त्‍यांना पाठिंबा दिला आहे. त्‍यामुळे या प्रस्तावित पार्किंग प्रकल्पाच्या छतावर रेस्टॉरंट उभारण्याबाबत कोणी सूचना दिली हे दिगंबर कामत यांनी स्‍पष्‍ट करण्‍याची गरज आहे असे ते म्‍हणाले.

मडगावचा विकास करण्‍यासाठी आपण भाजपमध्ये सामील झालो असे दिगंबर कामत यांनी म्‍हटले होते. त्‍यांचा हा विकास म्‍हणजे हे पार्किंग प्रकल्‍पाच्‍या छतावरील रेस्‍टॉरंट पुरता मर्यादित आहे का? की यासाठीच ते भाजपात गेले होते असा सवाल करून रेस्टॉरंटची कल्पना कोणी पुढे आणली या प्रश्नाचे उत्तर दिगंबर कामत किंवा नगरविकास मंत्री विश्वजीत यांनी द्यावे.

दिगंबर भाजपमध्ये गेल्यावर मंत्रिपदाचे स्वप्न पाहत होते पण त्यांना आता मडगाव नगरपालिकेवरच सेटल व्हायचे आहे असे वाटते. मडगावमध्ये नगराध्यक्षाना काही किंमत नाही, सर्व निर्णय दिगंबरच घेतात. टेनिस खेळात जसा नॉन प्‍लेईंग कॅप्‍टन असतो तसे दिगंबर मडगाव पालिकेतील नॉन प्‍लेईंग नगराध्‍यक्ष झाले आहेत का असा सवाल त्‍यांनी केला.

Vijai Sardesai
Old Goa: हेरिटेज क्षेत्रातील बांधकाम पाडण्याचा आदेश थेट रद्द करणे अयोग्य, SC चे HC च्या निवड्यावर निरीक्षण

सोनसोडो प्रकल्‍पाच्‍या खाली पाच हजार चौ. मी. जागेत वीजेचे उपकेंद्र सुरु करण्‍याच्‍या प्रकल्‍पावर विचार करून त्‍यासाठी जागा पहाण्‍यासाठी सरदेसाई आणि कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स हे त्‍या जागी आले होते. त्‍यावेळी पत्रकारांनी त्‍यांना या नियोजित रेस्‍टॉरंटबद्दल विचारले असता, सरदेसाई म्हणाले, मी आणि माझे नगरसेवक प्रस्तावित पार्किंग प्रकल्पात रेस्टॉरंटला नक्कीच विरोध करू.

मडगाव वाचवण्याची मोठी गरज आहे, मडगावच्या विकासासाठी मडगावच्या आमदारांनी काहीही केलेले नाही, सोनसडोच्या सर्व समस्यांना मडगावचे आमदार पूर्णपणे जबाबदार आहेत त्यांनी कॉमेक्स आणले ते अयशस्वी झाले नंतर त्यांनी फोमेंतोला आणले काहीही सुधारले नाही आता त्यांनीच पुढाकार घेऊन नवीन बायोमेथिनेशन प्रकल्‍प बसविण्‍याचे ठरविले आहे.

तिथेही परिस्थिती तशीच आहे. एसजीपीडीए मार्केटमध्‍ये घातलेला ५ टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्‍याचा प्रकल्‍प अयशस्वी झाला आहे, त्‍याची घाण फातोडर्ातील लोकांना सोसावी लागते. गणेश चतुर्थीपर्यंत यावर तोडगा आला नाही तर अाम्‍ही लोकांना घेऊन रस्‍त्‍यावर येऊ असा स्पष्ट इशारा त्‍यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com