Subhash Phaldesai, Goa Heritage Policy  Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा वारसा धोरण लवकरच अंमलात येणार! मंत्री फळदेसाईंची माहिती; महसूल, पर्यटन वाढीसाठी होणार प्रयत्न

Goa Heritage Policy: गावात ज्या वास्तू, मूर्ती, इतर ऐवज व लोप पावणारी लोककला त्यांचे संवर्धन करण्यात येईल, तसेच पर्यटन वाढीसाठी असे पुराभिलेख, पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील ऐतिहासिक वास्तु, संस्कृती, परंपरा, लोककला आदी अबाधित राखण्यासाठी गोवा वारसा धोरण लवकरच अमलात येईल. गावात ज्या वास्तू, मूर्ती, इतर ऐवज व लोप पावणारी लोककला त्यांचे संवर्धन करण्यात येईल, असे पुराभिलेख, पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई बोलत होते. यावेळी सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई व पुराभिलेख खात्याचे अधिकारी बालाजी शेणवी उपस्थित होते. फळदेसाई म्हणाले की, हे वारसा धोरण पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार असून गरज भासल्यास पाच वर्षानंतर योग्य ते बदल करण्यात येणार आहेत. ऐतिहासिक वास्तु व इतर गोष्टी खासगी मालकीच्या आहेत, त्यांच्या मालकी हक्कावर कोणत्याही प्रकारचा दगा न आणता त्यांचे संवर्धन करून महसूल तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धोरणातील खास बाबी...

राज्यातील अनेक राजवटीतील खासगी वास्तु आहेत, पोर्तुगीजकालीन घरे आहेत त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यांच्या संवर्धनासाठी व्याजरहित कर्ज देण्यात येईल.

आझाद मैदान, लोहिया मैदान यांना १०० वर्षे पूर्ण झाले नसल्याने ती पुरातत्व खात्याअंतर्गत येत नाही, त्यामुळे त्यांच्या देखरेख, विकासाबाबत अनेक प्रश्‍न निर्माण व्हायचे परंतु या धोरणामुळे तो प्रश्‍न सुटणार आहे.

वारसा धोरणामुळे अनेक नवे वास्तु, स्मारके जी संवर्धन वास्तु कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आली नाहीत, त्यांचा समावेश करण्यात येईल.

वारसा जतन करत पर्यटनास चालना देणे, विद्यार्थ्यांमध्ये आपल्या वारशाबद्दल आवड निर्माण करण्याचे कार्य देखील करण्यात येणार आहे.

यंदा पर्पल फेस्टचे आयोजन हे ९ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे.

प्रत्येक खात्यांचा सहभाग

गोवा वासरा धोरण हे केवळ पुरातत्त्व खात्याद्वारे अमलात येणार नाही त्यासाठी प्रत्येक खात्यांच्या सहभाग असणार आहे. खाजन शेतीच्या संवर्धनासाठी कृषी खाते काम करेल, लोककला-लोकसंस्कृती संवर्धनासाठी कला आणि संस्कृती खाते काम करेल, वारसा पर्यटनासाठी पर्यटन खाते कार्य करेल, त्यामुळे प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असेल, परंतु या धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी सर्व खात्यांशी संलग्न असलेली कृतिदल समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक खाते वारसा संवर्धनासाठी नवीन कायदे, योजना आखून वारसा संवर्धनासाठी कार्य केले जाणार असल्याचे सचिव लोलयेकर यांनी सांगितले.

सध्या २२० वारसा स्थळे

राज्यात सद्यःस्थितीत नोंदणीकृत २२० वारसा स्थळे आहेत.

१२२ वारसा घरे, ४६ लोककला प्रकार, ६१ पारंपरिक व्यवसाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

SCROLL FOR NEXT