Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात पावसाची 'नव्वदी' पार! ऑरेंज अलर्ट कायम; वाळपई, धारबांदोड्यात मुसळधार

Goa Weather: रविवारी दिवसभर पाऊस कायम राहिल्‍याने पावसाने इंचांची ९० पार केली असून, सोमवारीही हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. त्‍यामुळे सोमवारीही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍य हवामान विभागाने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार, रविवारी दिवसभर राज्‍यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते १७ ऑगस्‍टच्‍या सकाळपर्यंत ८७.२९ इंच पावसाची नोंद झाली होती.

रविवारी दिवसभर पाऊस कायम राहिल्‍याने पावसाने इंचांची ९० पार केली असून, सोमवारीही हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. त्‍यामुळे सोमवारीही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

तथापि, आतापर्यंत वाळपई, धारबांदोडा, केपे आणि सांगे या चार केंद्रांवर पावसाने इंचांची शंभरी पार केली आहे. दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा राज्‍यात मान्‍सूनपूर्व पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्‍यानंतर अंदाजाच्‍या बारा दिवस आधीच मान्‍सून गोव्‍यात दाखल झाला. राज्‍यात दाखल झाल्‍यानंतर सुरुवातीच्‍या काही दिवसांत मान्‍सूनच्‍या पावसाने राज्‍यभर हजेरी लावली.

त्‍यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. गेल्‍या काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्‍यामुळे पुढील काही दिवस राज्‍यात मुसळधार पाऊस पडण्‍याचा अंदाज वर्तवत हवामान विभागाने शनिवारी दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज’ आणि त्‍यापुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला होता.

त्‍यानुसार सकाळपासूनच राज्‍यात पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे वाळपई, डिचोली आदी भागांमध्‍ये पडझडीच्‍या किरकोळ घटना घडल्‍या. तर, काही भागांत मुख्‍य आणि अंतर्गत रस्‍त्‍यांवर पाणी साचल्‍याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT