Heavy Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: चक्रीय वारे घोंगावतेय! गोव्यात 'पाऊस' वाढणार; यलो अलर्ट जारी

Goa Rain Alert: मागील २४ तासांत राज्यात सरासरी १.८६ इंच इतक्या पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात ११०.९८ इंच पाऊस पडला आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत ६.४ टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाचे धुमशान सुरू असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून ऐन चतुर्थीत पावसाची तीव्रता वाढली आहे.

विदर्भात समुद्रसपाटीपासून ७.६ किमी अंतरावर चक्रीय वारे घोंगावत आहे. त्यासोबतच कर्नाटकातील काही भागांत ट्रफ्स निर्माण झाले आहेत. याच्या प्रभावातून राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार-पाच दिवस राज्यात मध्यम पाऊस कायम राहणार असून गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी १.८६ इंच इतक्या पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात ११०.९८ इंच पाऊस पडला आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत ६.४ टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे.

तीन दिवसांत ११.२९ इंच

राज्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार ते गुरुवारदरम्यान राज्यात एकूण २८६.८ मिमी म्हणजेच ११.२९ इंच पाऊस बरसला आहे. मंगळवारी ४७.४ मिमी, बुधवारी १६०.१ मिमी तर गुरुवारी राज्यात ७९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

कोठे काय झाले?

१. पालयेत सकाळी वीजखांबावर आंब्याचे झाड कोसळून वीज खंडित. २. वास्को येथी हॅप्पी अपार्टमेंटच्या दोन बाल्कनी कोसळल्या. ३. पणजीत रस्त्यांवर साचले पाणी, दुचाकीस्वारांची तारांबळ.

वाळपईत ३ इंच पावसाची बरसात

मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक ३.२० इंच पावसाची नोंद वाळपई येथे करण्यात आली. तर त्या खालोखाल मुरगाव येथे २.७८ इंच, धारबांदोडा २.४६ इंच, केपे २.४४ इंच, फोंडा २.२८ इंच, सांगे २.२२ इंच, पेडणे १.८० इंच, पणजी १.४५ इंच, साखळी १.२९ इंच, म्हापसा १.२६ इंच, काणकोण १.१८ इंच, जुने गोवा १ इंच आणि दाबोळी येथे २२.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

राजधानीत साचले गुडघाभर पाणी

राजधानी पणजीतील दयानंद बांदोडकर रस्त्यालगतच्या कांपाल रस्त्यावर प्रामुख्याने आरोग्य संचालनालयापासून कला अकादमीपर्यंत अंतर्गत रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यालगतची गटारे तुंबल्याने हा प्रकार घडला. त्यासोबतच बसस्थानकाशेजारील शहरात प्रवेश करण्यासाठीच्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे बरेच हाल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: 'संकटांचा काळोख दाटला, मदतीचा दिवा उजळला'! आगीत घरदार, सोनंनाणं जळालं; 'त्या' कुटुंबाला मिळणार हक्काचे घर

Goa Politics: 'हा पक्षप्रवेश थांबवा'! अमित सावंत विषयावरती ठाकरेंनी बजावले; ‘काँग्रेस-फॉरवर्ड’मध्ये राजकीय तमाशा Watch Video

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंतीला लोटला जनसागर! मडगावात भव्य मोटारसायकल रॅली; काणकोण येथे सांस्कृतिक सादरीकरणे

Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

IFFI 2025 Opening: ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने उघडणार इफ्फीचा पडदा! काय असणार रूपरेषा; गोव्यातला फिल्म्स कोणत्या? पहा Video

SCROLL FOR NEXT