धारबांदोडा : गोव्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. ऐन चतुर्थीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची भंबेरी उडाली आहे. गोवा वेधशाळेने २९ ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट दिला होता.
पुढील ३ ते ४ तासांमध्ये मध्यम पाऊस ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ३०–४० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, जास्तीत जास्त ५० किमी प्रतितासांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अचानक आलेल्या पावसाने काही भागात पडझड आणि पूरसदृश्य स्थिती झाली आहे.
सांगेतील पोर्तुगीज कालीन वालशे पुल गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. इथे दोन नद्यांचा पूर येत असून त्यातच पुलाची उंची कमी असल्याने पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे.
मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दावकोण व निरंकाल येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
डिचोलीत पावसाच्या रौद्रावतारामुळे पुरसदृश्य स्थिती झाली आहे. बंदरवाडा रस्ता पाण्याखाली गेला असून रिव्हर फ्रंट प्रकल्पात पाणी घुसले आहे. विविध ठिकाणी पडझड झाल्याची माहिती मिळालेली आहे.
गावणे- बांदोडा येथे रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले आहे . या दुर्घटनेत काही वाहनाचे नुकसान झाले आहे . फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.
24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!
यंदाच्या मान्सून हंगामात 1 जून ते 28 ऑगस्टच्या सकाळी 8.30 पर्यंत राज्यात 109.22 इंच पावसाची नोंद झाली आहे . बुधवार आणि गुरुवारच्या 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. आतापर्यंत धारबांदोड्यात सर्वाधिक 143.53 इंच पाऊस पडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.