Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? नवरात्रीच्या उत्साहावर सावट; गोवा, महाराष्ट्रात मुसळधार शक्य

Goa Weather: बंगालच्या उपसागरातून सरकणारा कमी दाबाचा पट्टा मध्य भारतातून पुढे जात असल्याने गोवा, मध्य भारत, महाराष्ट्र आणि इतर काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

महत्वाचे मुद्दे:
१. बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचा पट्टा राज्यात पाऊस आणणार आहे.
२. पुढील दोन-तीन दिवस गोवा, मध्य भारत आणि महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस.
३. शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांनी सुरक्षितता आणि काळजी घेण्याचे आवाहन.

राज्यात आठवड्याभरापासून पावसाचा जोर मंदावला होता, परंतु शुक्रवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरातून पश्चिमेकडे सरकणारा कमी दाबाचा पट्टा मध्य भारतातून पुढे जात असल्याने गोवा, मध्य भारत, महाराष्ट्र आणि इतर काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

शासनाने या पार्श्वभूमीवर शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी दुपारपासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू झाली, मात्र संध्याकाळी पाऊस काहीसा मंदावला. हवेत गारवा कायम असल्यामुळे तापमानात मोठा बदल दिसून येत नाही.

राज्यात मागील २४ तासांत सरासरी ९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याचे अहवालानुसार, नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रशासनाने संभाव्य पुरस्थितीसाठी बचावकामाची तयारी सुरू ठेवली आहे. नागरिकांनी वीज खांबाजवळ राहणे टाळावे आणि पावसाच्या काळात वाहतूक नियमांचे पालन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT