Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Goa Monsoon: काही दिवसांच्या तुरळक प्रमाणानंतर अचानक बुधवारपासून पावसाने राज्यात जोर धरला आहे. गुरुवारी अनेक सखल भाग पूरग्रस्त बनले. अनेक ठिकाणी पडझड झाली.

Sameer Panditrao

पणजी: काही दिवसांच्या तुरळक प्रमाणानंतर अचानक बुधवारपासून पावसाने राज्यात जोर धरला आहे. गुरुवारी अनेक सखल भाग पूरग्रस्त बनले. अनेक ठिकाणी पडझड झाली. उद्याही (ता. ४) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून शिक्षण खात्याने शाळांना सुटी जाहीर केली आहे.

राज्यातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून दरडी कोसळणे, रस्ते पाण्याखाली येणे, नदीची पाणी पातळी वाढणे, सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळून घरे आणि वाहनांचे नुकसान आदी प्रकार मोठ्या

प्रमाणात घडले असून पावसाचा जोरही कायम आहे. पावसाचा जोर शुक्रवारी देखील कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने गोवा वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, शक्यतो पावसात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून दरडी कोसळणे, रस्ते पाण्याखाली येणे, नदीची पाणी पातळी वाढणे, सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळून घरे आणि वाहनांचे नुकसान आदी प्रकार मोठ्या

प्रमाणात घडले असून पावसाचा जोरही कायम आहे. पावसाचा जोर शुक्रवारी देखील कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने गोवा वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, शक्यतो पावसात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कमतरताही काढली भरून

राज्यात १२.५० टक्के पावसाची कमतरता होती; परंतु ती एकाच दिवसाच्या पावसाने भरून काढली आहे. राज्यात आतापर्यंत १०२७.३ मिमी म्हणजेच ४०.४४ इंच पावसाची नोंद झाली असून आता पावसाने पन्नाशी गाठण्याकडे आगेकूच केली आहे.

हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस

गेल्या २४ तासांत राज्यात १६१.१ मिमी म्हणजेच ६.३४ इंच पावसाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत एकाच दिवशी पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. धारबांदोडा येथे ९ इंच पाऊस पडला, जो एका केंद्रावर पडणारा यंदाचा सर्वाधिक पाऊस आहे.

दिवसभरात पडझडीचे ६२ हून अधिक कॉल

राज्यात गेल्या २४ तासांत राज्य अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाला एकूण ६२ हून अधिक कॉल प्राप्त झाले. यातील तीन घटना आगीशी संबंधित होत्या. सर्वांत गंभीर घटना म्हार्दोळ येथे घडली, जिथे घरावर झाड कोसळले. या दुर्घटनेत घराचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच दोन वाहनांचेही नुकसान झाले आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण

पारोडा-मडगाव मार्गावर पाणी साचल्यामुळे पारोडा, केपेसह जवळच्या भागातील गटारे, नाले आदींची तत्काळ साफसफाई करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा, पूरस्थितीजन्य भागातील वीज ट्रान्स्फार्मर्स, वीज खांब तसेच इतर वीज साहित्याची पाहणी करून जनतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावी, असे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी साबांखा व वीज खात्याला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT