goa heat wave latest weather update Dainiak Gomantak
गोवा

Goa Heat Wave: उन्हाचा 'कडाका' अन् घामाच्या 'धारा'; मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिक उकाड्याने हैराण, कमाल तापमान 36 अंशांवर

Goa Highest Temperature: मागील दोन आठवड्यांपासून राज्यात उष्म्याचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कधी कमाल तर कधी किमान तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मागील दोन आठवड्यांपासून राज्यात उष्म्याचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कधी कमाल तर कधी किमान तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. सोमवारी राज्यात कमाल तापमान ३६ अंशांवर पोहोचले, तर किमान तापमान २८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे यंदाचे आतापर्यंतचे सर्वाधिक किमान तापमान आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात १.९ अंश, तर किमान तापमानात १.४ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.

आर्द्रता ८३ टक्के इतकी नोंदविण्यात आली. यापूर्वी एप्रिल महिन्यातही किमान तापमान २८.६ अंशांपर्यंत गेले होते; आता मे महिन्यातही अशीच नोंद झाली आहे. सातत्याने किमान तापमानात वाढ होत असल्याने उष्मा अधिक जाणवत आहे. गेल्या दोन वर्षांतील तापमानाचा आलेख पाहता कमाल तापमान साधारण स्थिर राहिले आहे; मात्र किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. यंदा एप्रिल महिन्यातही सलग दोन-तीन दिवस किमान तापमानात वाढ झाली होती.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

राज्यातील तापमानवाढीमागे अनेक कारणे असली, तरी हवेतील बाष्प व आर्द्रतेत झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. रात्री व पहाटेही आर्द्रता वाढल्याने घाम येणे, असह्य उष्मा जाणवणे अशा त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या उष्म्यात नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT