Goa | Dainik Gomantak
गोवा

गोव्याला सुरक्षित अन्न उपायांसाठी सतत तीन वर्षे प्रथम पुरस्कार

World Food Safety Day 2022: यावर्षीच्या अन्नसुरक्षा दिनाचे ब्रीद आहे, ‘सुरक्षित अन्न, सुदृढ आरोग्य

दैनिक गोमन्तक

अन्न सुरक्षित असावे, भेसळयुक्त अन्न शोधून त्यावर उपाय योजावेत, भेसळयुक्त अन्न देणाऱ्या घटकांवर कारवाई करावी व अनारोग्य पसरवणाऱ्या खराब अन्नाविषयी जागृती, ही अन्नसुरक्षा दिन साजरा करण्याची उद्दीष्टे आहेत. अन्नातून निर्माण होणारे आजार टाळले जाऊ शकतात. अन्न सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावर्षीच्या अन्नसुरक्षा दिनाचे ब्रीद आहे, ‘सुरक्षित अन्न, सुदृढ आरोग्य’. (World Food Safety Day 2022 Goa News)

अन्नसुरक्षा ही निरोगी आणि सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली. खराब आणि असुरक्षित अन्नामुळे जगभर मुले दगावण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. प्रतिवर्षी जगभरात भेसळयुक्त अन्नामुळे 4 लाख 20 हजार जण मृत्युमुखी पडतात; तर दहापैकी एक माणूस खराब अन्नामुळे आजारी पडतो. पौष्टिक अन्नाच्या अभावी लठ्ठपणाचा आजार देशात बळावू लागला आहे. त्याशिवाय दातदुखी, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी व कर्करोग या आजारांनी जगाबरोबर आपल्या देशाचीही कुरतड चालवली आहे.

कमी दर्जाचे, जंक फूड खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतोच, शिवाय हृदयावरही त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे निष्कर्ष आहेत. अतिसाराचेही प्रमाण खूप आहे. भेसळयुक्त अन्नामुळे प्रतिकारशक्तीही (Immunity) त्यामुळे कमी होते. पोषक अन्न (healthy Food) मिळत नसल्याने आपल्या देशातही मुलांना आजाराने ग्रासले आहे आणि काही श्रीमंत भागांतही वेगळी परिस्थिती नाही.

अन्न व औषध संचालनालयाकडे सध्या योग्य कर्मचारिवर्ग आहे. सात नवे कर्मचारी खात्यात रुजू झाले आहेत. खात्याची प्रयोगशाळाही देशांतर्गत मापन संस्थेने मान्यता दिल्यामुळे सुसज्ज आहे. शिवाय राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाकडूनही तिला प्रमाणपत्र प्राप्त झाले .

एफडीएच्या मते, कर्मचारी दक्षिण व उत्तर गोव्यात दरदिवशी अन्न आस्थापनांना भेटी देत त्यांची तपासणी करत असतात. आम्हाला गेल्या वर्षभरात उपहारगृहे बंद करावी लागली नाहीत. आता नवीन नियमावलीनुसार आम्ही त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळवून देतो. त्यांच्यामध्ये दोष आढळल्यास आठवड्याभरात ते सुधारण्यास सांगितले जाते. खात्याने कारवाई केल्यास उपहारगृहे अनेक महिने बंद राहू शकतात.

1) काही वर्षांपूर्वी येथील प्रमुख कारागृहात अन्नविषबाधेमुळे अनेकजण आजारी पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर चौकशीही झाली. परंतु, गोव्यात (Goa ) अन्नविषबाधा हा प्रकार फारसा ऐकूच येत नाही.

2) समाज माध्यमांवर पर्यटकांनी (Tourist ) लिहिलेल्या वृत्तांताचा आढावा घेतल्यास गोवा अन्नसुरक्षेबाबत आघाडीवर असल्याचाच निष्कर्ष काढता येईल.

3) किनारपट्टीवरील (Beach) उपहारगृहे, उघड्यावर पदार्थ विकणारे गाडे, मत्स्य प्रकार तसेच चिकन, मटण शॉप यांच्याबाबतसुद्धा फारशा तक्रारी नाहीत. गोव्यातील मासळीही (Fish) बऱ्याच प्रमाणात सुरक्षित मानली जाते.

4) फॉर्मेलिनबाबत गहजब निर्माण झाल्यावर लोकांनी सरकारवर दबाव वाढवला होता. दुर्दैवाने फॉर्मेलिन तपासणीबाबत मडगावमध्ये सुरू होणार असलेल्या प्रयोगशाळेचे काम रखडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT