दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न (Healthy Food) खाण्याबद्दल जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. (World Food Safety Day 2022 News)
हा दिवस 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला होता. दरवर्षी जगभरात 600 दशलक्ष लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडतात. यामुळे लोकांना खाण्याच्या चांगल्या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणुन घेऊया खाण्याच्या चांगल्या सवयीं कोणत्या असायला पाहिजे.
काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
बाहेरून आनलेल्या भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा.
याशिवाय तुम्ही ज्या भांड्यांमध्ये अन्न घेत आहात, ती भांडी स्वच्छ आहेत याची काळजी घ्यावी.
झुरळ, माश्या, मुंग्या इत्यादी भांड्यांमध्ये धोकादायक जीवाणू पसरवू शकतात.
कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवावे.
शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये कारण त्यात बॅक्टेरिया फार लवकर वाढु शकतात, त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.