चिखली दाभोळ येथे गढूळ पाण्यामुळे त्रासलेल्या लोकांनी एकत्रित येऊन भग्नावस्थेत पोचलेली टाकी हटवण्याची मागणी केली.

 

Dainik Gomantak

गोवा

Goa: गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य समस्या

सदर भग्नावस्थेत पोचलेली ताकी त्वरित हटवून त्या ठिकाणी नवीन टाकीची व्यवस्था करावी अशी मागणीही यावेळी समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी केली.

दैनिक गोमन्तक

वास्को: चिखली दाबोळी येथील एका दुर्मिळ झालेल्या पाण्याच्या टाकीतील गढूळ पाणी (Water) येथील लोकांना प्यावे लागत असल्याने आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्याने सदर चिखली वासियांना नाराजी व्यक्त करून संबंधितांनी याविषयी त्वरित लक्ष घालून सदर टाकीचा सोक्षमोक्ष लावून या ठिकाणी नवीन टाकी उभारावी अशी मागणी केली आहे.

दाबोळी मतदार संघातील चिखली उपजिल्हा इस्पितळाच्या (subdistrict hospital) मागे दाट लोकवस्तीत सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी असून संबंधितांकडून त्या टाकीची देखभाल न झाल्याने सदर टाकीची दुर्मिळ अवस्था झाली आहे. सदर टाकी झाडाझुडपांनी व्यापलेली आहे. 02 ऑगस्ट 2000 साली विद्यमान मुख्यमंत्री (CM) फ्रान्सिस सार्दिन यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुभाष शिरोडकर तसेच महसूल मंत्री माविन गुदिन्हो व चिखली सरपंच शुभदा पवार यांच्या उपस्थितीत सदर टाकीचे लोकार्पण करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात एकदाच या टाकीची साफसफाई केल्याची लोकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी या टाकीकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नसल्याचे स्थानिकांनी सांगून नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी आणखी एक ओव्हर हेड पाण्याची टाकी होती ती भग्नावस्थेत पोहोचली होती. तसेच पाडण्याच्या मार्गावर होती. सदर टाकी दाट लोकवस्तीत असल्याने स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर येथील सदर टाकी हल्लीच पाडण्यात आली.

नवीन टाकी उभारण्यात येईल असे या लोकांना (people) आश्वासन संबंधित खात्याकडून देण्यात आले होते. मात्र ते आश्वासन हवेतच विरून गेले. दरम्यान या ठिकाणी असलेली दुसरी टाकी ही आता भग्नावस्थेत पोचली असून या टाकीला गळती लागली आहे. तसेच या टाकीची कित्येक वर्षापासून संबंधितांकडून निगा राखली नसल्याने या टाकीत चिखल तयार झाला आहे. येथील लोकांना चिखलाचे पाणी सोडले जाते.

तसेच पाणी मिळावे तर मिळाले नाही तर पाणीच नसते. सुमारे 10 हजाराहून अधिक दाबोळीवासिय या टाकीचा पाण्याचा उपयोग करतात. मात्र पाणी येत नसले तर या टाकी चा काय उपयोग. तसेच या टाकीत चिखल निर्माण होऊन जंतू निर्माण झाल्याचा दावा येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. यावर तातडीने उपाययोजना आखण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे. दरम्यान येथील समाजसेवक (Social worker) तुळशीदास फळदेसाई यांनी लोकांच्या या समस्येकडे संबंधितांनी गांभीर्याने पाहणे फार गरजेचे आहे.

पाण्याची टाकी दुर्मिळ झाल्याने लोकांना घाण पाणी सोडले जाते. यामुळे लोकांच्या आरोग्यावर भयावह परिणाम होणार. या दूषित पाण्यामुळे कसला रोग उद्भवळणार हे लोकांना माहिती सुद्धा पडणार नाही. तेव्हा संबंधितांनी लोकांच्या या गंभीर विषयावर त्वरित लक्ष घालून समस्या सोडवण्यास यावी अशी विनंती केली आहे. सदर टाकी साफ करायला घेतली तर दोन ट्रक भर चिखल काढला जाईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सदर भग्नावस्थेत पोचलेली ताकी त्वरित हटवून त्या ठिकाणी नवीन टाकीची व्यवस्था करावी अशी मागणीही यावेळी समाजसेवक तुळशीदास फळदेसाई यांनी केली. तसेच दाबोळी मतदार संघातील नवेवाडे येथे असलेल्या दोन टाक्या व बोगमाळो येथील टाकीचीही साफसफाई करण्यात यावी अशीही मागणी तुळशीदास फळदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT