Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: राज्यात गेल्या पाच वर्षात एकूण 49,495 नवजात अर्भकांची तपासणी

172 बालकांवर होणार उपचार

Akshay Nirmale

Vishwajit Rane: गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी काही दिवसांपुर्वीच गोव्यात सरकारी रूग्णालयात जन्माला येणाऱ्या बालकांवर 72 तासांमध्ये 5 आजारांच्या तसेच 46 विकारांच्या तपासणीसाठी चाचण्या करण्यात येतील, असे सांगितले होते.

दरम्यान, 2018 पासून आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या 5 वर्षात एकूण 49,495 नवजात अर्भकांची तपासणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

त्यापैकी 172 बालकांमध्ये काही समस्या आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रूग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

सोशल मीडिया पोस्टमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, आम्हाला हे सांगायला आनंद वाटतो आहे की, 2018 मध्ये लहान मुलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही हाती घेतलेला कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, उत्तर जिल्हा आणि दक्षिण जिल्हा रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे बाळांच्या चयापचयातील त्रुटी शोधण्यासाठी नवजात मुलांची तपासणी केली जात आहे.

अर्भकांच्या जीवनाची निरोगी सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT